|| श्री गणेशदत्तगुरुभ्यो नमः ||
आपली भाषा निवडा:
मराठी
हिन्दी
English
संस्कृत
घरपोच ग्रंथसेवा
आचरण
"आचरण"
परमपूज्य श्री रामकृष्ण क्षीरसागर महाराजांनी "आचरण" या विषयावर केलेले मार्गदर्शन-
गुरूंनी जे ज्ञान आपल्याला दिले ते आपले स्वतःचे आहे, असे लोकांना भासविण्याचा प्रयत्न करू नये. हे ज्ञान आपलेच आहे असा आव आणून जर ते आपण लोकांना सांगत राहिलो तर बोलणाऱ्या व ऐकणाऱ्या दोघांतही त्याचा साठा राहत नाही. गुरूंनी दिलेलेज्ञान आत्मसात जरूर करावेपण ते दुसऱ्याला सांगताना
"इदंन मम"
असे म्हणून सांगावे. असेन केल्यास गुरुद्रोह होतो. जसे ज्ञानेश्वरांची ओवी, संत तुकारामाचे अभंग, स्वामी रामदासांचे श्लोक यांचा संदर्भ देताना आपण त्यांची नवे घालतोच ना? असेच म्हणतो ना कि ज्ञानेश्वरांनी आपल्या अमुक ओवीत अमुक गोष्ट अशी सांगितलेली आहे किंवा तुकारामांच्या अभंगातून अमुक गोष्ट शिकायला मिळते: तसेच हे ही आहे. हि गुरुवाणी आहे. असा कोणताही गुरुद्रोह अप्रत्यक्षरीत्या केल्यास त्याला आत्मदहनाशिवाय दुसरेप्रायश्चित्त नाही. यासाठी अशा कृत्यांपासून दूर राहावेव योग्य तोच मार्ग अनुसरावा.
गुरुकुल आपला आधार आहे. आपल्या मनाच्या निवाऱ्याची पवित्र जागा आहे. येथेयोग्य असेच वागावे. गुरुकुलात किंवा सत्संगात वागताना अहंकार होऊ देऊ नका. कुणाचाही अपमान करूनका. वृत्ती सात्विक ठेवा. सारखे रागावू नका. प्रसंगी रागावणे योग्य पण सतत रागावणे केव्हाही वाईट. गुरुंसमोर बसताना मांडी घालून बसावे. कारण आपलेपाय त्यांना दिसणे योग्य नाही. पण आपण मात्र त्यांच्या चरणांचेदर्शन घ्यायचे असते.
आपण ज्या सत्संग मंडळात आहोत त्याबद्दल आपल्याला आपलेपणा असावा. आपण आत्मपरीक्षण करीत राहावे. आपली श्रद्धा वाढली का? आपल्या वृत्तीत बदल झाला का? जर होत नसेल तर आपण कुठे चुकतो? आपले काय चुकते? ते शोधावे. सर्व प्रयत्नांनी यश येत नसेल तर मात्र गुरूंच्या कानावर घालावे. आपलं वागण असं असावं कि आपणाकडे पाहणाऱ्याला वाटल पाहिजे कि, हा गुरुसान्निध्याचा परिणाम आहेव त्यांना या मार्गात येण्याच्या भावना निर्माण झाल्या पाहिजेत. सत्संगात येऊन नुसते कोरडे राहू नका. रोजच्या रोज थोडेपुण्य मिळवा. प्रसंगी दुसऱ्याला मदत करा. दुःखी, रोगी माणसाला जवळ करा. जातीभेद, धर्मभेद करूनका. भेदाची भावना हि मनाला लागलेली कीड आहे. सत्संगाच्या माध्यमातून आपण ऋणानुबंध वाढवीत असतो. या ऋणानुबंधाची जाण ठेवावी. प्रसंगी सत्संग मंडळातील बंधूभगिनींच्या घरी जावे. व्यवहार म्हणून काहीतरी स्वीकारावे. किमान दुध, फळे घ्यायला हरकत नाही. हेऋणानुबंध टिकावेत. उगीच जातीवाद उकरून छिद्र पाडूनये. छिद्र हे पुढे भगदाड होते हे लक्षात ठेवा.
*संदर्भ-अमृत कलश
।। श्री गुरुदेव दत्त ।।
नवीन माहिती
श्रीगुरुमार्गदर्शन
संस्कृत अध्ययन
गुरुभक्तांचे अनुभव
फेसबुक
Android
पर्याय:
दर्शनाच्या वेळा
मुख्यपृष्ठ
सद्गुरु
धर्मकार्य
सद्गुरुंचे जीवन आणि कार्य
उत्सव
आशीर्वाद
स्तोत्र
सद्गुरु उवाच
प्रश्न-उत्तरे
दैनंदिन नियम
गुरुभक्तांचे लेख
श्रीरामकृष्ण सेवा प्रतिष्ठान
ध्वनि
संपर्क
प्रकाशने:
श्री गुरुदेव दत्त अँप्लिकेशन
ग्रंथसंपदा
श्री दत्त देवस्थान ट्रस्टची प्रकाशने
Privacy Policy