॥ श्री गणेश दत्त गुरुभ्यो नमः ॥
गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु र्गुरुर्देवो महेश्वरः ।
गुरुरेव परंब्रह्म तस्मैश्रीगुरवेनमः ॥१॥
ईश्वरी शक्ती कधीही नाश करीत नाही पण उन्मत्तपणाची, भाषा, अहंकार यामुळे त्यांना शस्त उचलाव लागते. हिरण्यकश्यपूबाबत रावण आणि कंस इत्यादी बाबत हेच घडले. आपल्याला होणारा त्रास हा ईश्वराचा न्याय आह तो आपण सहन केलाच पाहिजे. जोपर्यंत दुख भोगतो तोपर्यंत तरी त्याला न्याय म्हणण्यास हरकत नाही. दुःख सहन करण्याची ताकद ठेवा. असे भोग भोगल्यान मनुष्य पापा पासून मुक्त होतो. पाण्यातून पोहणारा प्राणी पाणी कापत जातोच ना? पाणी माग राहते व तो किनाऱ्याला लागतो. पाणी काही पुन्हा त्याच्या माग धावत येत नाही. जोपर्यंत आपल्या मनात चांगले भाव आहेत तोपर्यंत आपल्याला पाप शिव शकत नाही. राग, वास, भावना या मनुष्याच्या मुल शरीरात नसतात. त्या वातावरणातील लहरींमुळ निर्माण होतात. हास म्हटल्यावर हास येत नाही आणि रड म्हटल्यावर रडू येत नाही तरीही या पृथ्वीवर एकाच वेळी कोणी हसत असतो कोणी रडत असतो कोणी शांत बसतो तर कोणी आनंदमय असतो. हे सगळ घडत कसे? हे सगळे त्या प्रचंड ईश्वरी शक्तीच्या न्यायबुद्धीमुळ घडत असते. या शक्तीला सगुण म्हणावे तर दिसत नाही आणि निर्गुण म्हणाव तर अनुभवाला आल्याशिवाय राहत नाही. दैवी शक्तीच्या या लहरी अखंडपणे या विश्वात वावरत असतात. ज्याच्या त्याच्या कर्मा नुसार अनुभवाला येत असतात. कोणाचे कर्म कसे आहे हे सांगता येणार नाही.
तुम्ही ज्या प्रमाणात कर्म करता त्याप्रमाणे परमेश्वरी शक्ती न्यायाचे माप पदरात टाकते. तेच तुमच्या कर्माच माप आहे. ईश्वरी शक्तीला स्पर्श नाही ती अस्पर्शी आहे पण तिला गुणधर्म आहेत. हि शक्ती लिखित स्वरुपात कोठेच नसते पण अनुभवाला मात येते. हि शक्ती ऐन वेळेला निर्णय घेते. अगोदर कळूच देत नाही. एकदम एका घरातील सगळ्या लोकांचा मृत्यू होतो व एखादा लहानसा जीव वाचतो. एखादी व्यक्ती बायको प्रसूत झाली तिला मुलगा झाला म्हणून भेटायला जातो तर तो पोहचण्याआधीच बालकाचा मृत्यू होतो हे काय आहे? हि शक्ती आपल्या आवाक्याबाहेरची आह यावर आपण मात करू शकत नाही. या गोष्टी विधिलिखित म्हणाव्यात तर कुठ लिहिलेल्या सापडत नाही दैव म्हणाव तर आजपर्यंत जगत आलेलाच असतो. मूळ ईश्वरचेरूप पाहिल तर दयाळू सृष्टीचा पालनकर्ता असे आहे. तो नाश करूशकत नाही तरी सुधा असे घडत इथे मानवाची मती कुंठीत होते. आमच्यासारख तपस्वी सुद्धा त्याला उत्तर देऊ शकत नाहीत. या शक्तीला वाणी नाही बोलणं नाही जसे आपण प्रकाश पाहतो पण बोलू शकत नाही. या शक्तीला आपण आसुरी शक्ती म्हणू शकत नाही पण भय उत्पन्न करू शकते पण मृत्यू करू शकत नाही. हि शक्ती विध्वंसक नाही तर विधायक आहे. माणस जन्माला येतात काय धक्का लागून मारतात काय याला आपण निर्णायक शक्ती म्हणू शकतो. ती आपल्या कर्माच्या गतीतून निर्माण होते एवढे मात्र खरे या नंतर माणसाच्या मनाला तिची जाण होते हे खरे, दैवी शक्ती हि अनुभवावी लागते. परमेश्वर माणसाला त्याच्या कुकर्माबद्दल लगेच शिक्षा करीत नाही त्याला सगळी सुखे उपभोगू देतो. त्याचे मानवी हक्कावर गदा येऊ देत नाही पण अचूक वेळ साधून तडकाफडकी निर्णय देऊन टाकतो तो तिचा अंतिम निर्णय असतो. मानवाची बुद्धी किवा विज्ञानवादी माणसे तिथे हतबल होतात. ईश्वर जेव्हा मानवी रुपात अवतार घेतो तेव्हा तो सृष्टीची घडी पुन्हा बसवतो. सृष्टीमधे जे जे काही निर्माण झाले त्याच इतक हाल होऊ देत नाही. तो चराचर मध्ये ईश्वरी शक्तीविषयी आदर प्रेम निर्माण करतो. समस्त जनाला ईश्वराच्या भजनी लावतो. ज्यांचे अंगी साधुत्व आहे त्यांचे रक्षण करतो व असूरी शक्तीचा नाश करून परत सृष्टीची घडी व्यवस्थित बसवितो. आपण प्रभू रामचंद्र, भगवान श्रीकृष्ण, दत्तात्रेय यांची चरित्रे अभ्यासतो ते कशासाठी? तर या ईश्वरी शक्तीचा अनुभव घेण्यासाठी तिची भक्ती करण्यासाठीच ना? त्यामुळे हि शक्ती सदैव आपल्या पाठीशी उभी राहते. हि चरित्रेया उपासना, या श्रद्धा भगवंताने कशाकरिता मनुष्याला उपलब्ध करून दिल्यात? तर स्वतःला विसरण्यासाठी. जो भक्त ईश्वर उपासनेत तल्लीन होतो क्षणभर काहोईना स्वतःला विसरतो त्याच्या आयुष्याची वृद्धी होते. नुसते अन्न खाल्याने आयुष्याची वृद्धी होत नाही साधी देवळात घंटा वाजवली तरी मनुष्य एकाग्र होतो. रोज जीवनात जे काही अध्यात्म आचारात असाल ते केवळ टाकणे टाकून करू नका, एकग्रतेने भगवंताची नित्य उपासना करा. जे उपासनेचे क्षण असतील ती तल्लीन होऊन कर्तव्य भावनेने करा. यासाठी अहंकार सुटणे आवश्यक आहे. अहंकार सुटला कि इतर विषय आपोआप सोडून जातात ईश्वरावर भाव ठेवा ईश्वरी शक्ती उपाशी उठवतेपण कधी उपाशी झोपूदेत नाही. या वरून भगवंताच्या कृतीचा त्याच्या शक्तीचा विचार करा. तुमचा भाव तुमच्यापाशी जपून ठेवा, बाहेर त्याच प्रदर्शन करू नका ईश्वरी शक्ती विषयी किती सांगाव आणि किती नाही? तो अनुभवाला येतो पण दिसत नाही जळी, स्थळी, काष्ठी, पाषाणी तो आहे त्याने तुम्हाला मानवी जन्म दिला याबद्दल तुम्ही कृतज्ञ राहा दास बनून राहा त्यातच तुमच कल्याण आहे तिचा प्रकोप मानवी शक्तीच्या आवाक्याबाहेर आहे हे लक्षात असू द्या..... माझे आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी आहेतच ....! ...
।। श्री गुरुदेव दत्त ।।