आपली भाषा निवडा: घरपोच ग्रंथसेवा



सगुरूंनी सांगितलेले सहज पाळता येण्याजोगे काही दैनंदिन नियम

१. सूर्योदयाच्या वेळी जी तिथी असेल तीच तिथी त्या दिवसाची समजावी.
२. दररोज सूर्योदयापूर्वी ब्रह्ममुहूर्तावर (पहाटे ४.३० ते ६.००) उठावे व उठल्याबरोबर देवाला नमस्कार करावा.
३. प्रात: स्मरण झाल्यावर गुरुस्मरण करा. प्रधान देवतेचे स्मरण करा, शक्यतो दिवसभर नामोच्चरण करा. (श्रीगुरुदेव दत्त)
४. कुठल्याही परिस्थितीत सकाळी ७ नंतर झोपू नये. देवाला लवकर झोपलेले चालते पण लवकर उठलेले आवडते.
५. दातावर हलक्या हाताने ब्रश फिरवून घाण पुसून काढा. मोरीतील घाण काढण्यासाठी ब्रश वापरता तसे दातांसाठी वापरू नका. दातांची नैसर्गिक शुभ्रता टिकावा.
६. अंघोळ झाल्याशिवाय शक्यतो काही खाऊपिऊ नका. सकाळचे स्नान पूर्व दिशेला तोंड करून सूर्योदयापूर्वी करावे. स्नानाला शक्यतो थंड पाणी घ्यावे. जास्त गरम किंवा जास्त थंड पाणी घेऊ नये. थंड पाण्यात गरम पाणी टाकावे. नद्यांची नवे घेत स्नान करावे.
७. साबणाचा वापर टाळा किंवा साबणाचा तळहातावर फेस करून मग तो हलक्या हाताने केसाला किंवा त्वचेला लावावा. साबणाने आजपर्यंत कोणीही गोरे झाले नाही. त्वचेचा नैसर्गिक तेलकटपणा साबणाने नाहीसा होतो.
८. अंघोळीच्या नंतर तसेच सोमवार, गुरुवार, शनिवार व अमावास्येच्या दिवशी नखे, दाढी व केस कापणे करू नये.
९. शरीराचा नैसर्गिक तेलकटपणा टिकवण्यासाठी रोज डोक्याला खोबरेल तेल लावा व शरीराचे वंगण आहे. खोबरेल तेल डोक्याला लावले तर ते पोटा पर्यंत उतरते. केस काळे करण्याकरिता कलप किंवा मेहंदी लावू नये.
१०. प्रत्येकाने कुलदैवतांची सेवा व कुळाचार करायला हवे.
११. देवाची पूजा, उपासना करताना जांभया येऊ देऊ नयेत. त्या येऊ लागल्या म्हणजे देह अपवित्र होत जातो. जास्तच येऊ लागल्या तर हातपाय धुऊन ८ वेळा चुळा भराव्यात.
१२. देव देवतांच्या मूर्ती, अर्धवट मुखवटे तसेच देवघर भिंतीवर लटकत किंवा अधांतरी ठेऊ नका.
१३. घरातून बाहेर पडताना देवाला नमस्कार करून बाहेर पडावे.
१४. दूध दोन तीन वेळा खळखळ तापविल्या शिवाय वापरू नये. ते आटेल व कमी होईल याची चिंता करू नका.
१५. फळे व भाज्या आणल्यानंतर दोन ते तीन वेळा स्वच्छ पाण्याने धुतल्या शिवाय खाऊ नये.
१६. जेवताना टेबल खुर्चीवर बसत जाऊ नका. जमिनीवर मांडी घालून, पाचही बोटाने जेवावे, काटे चमच्याने जेऊ नये. ब्राह्मणाने आसनाशिवाय नुसत्या जमिनीवर बसू नये. जेवणात रोज एक मिरची खावी. जेवण झाल्यावर गुळाचा छोटासा खडा खावा.
१७. दोन जेवणात कमीत कमी ८ तासाचे अंतर असावे. मध्येच फार भूक लागली तर एखादे फळ किंवा दूध घ्यावे. शिळे तसेच एकदम थंड झालेले आणा घेऊ नये. शक्यतो परान्न टाळावे. रस्त्यावरील तसेच हॉटेलमध्ये खाणेपिणे करू नये.
१८. ज्यांना कर्तव्यदक्ष राहावयाचे आहे त्यांनी दुपारी झोपू नये.
१९. घरात येताना दाराशी थोडे थांबून शांतचित्ताने घरात प्रवेश करावा.
२०. संध्याकाळच्या वेळेस स्प्रे, अत्तरे, पावडर, सुवासिक तेल लावून बाहेर पडू नका.
२१. घरात दररोज साजूक तुपाचा दिवा तसेच सुगंधी उदबत्ती, धूप वापरा. पांढरा धूप चांगला असतो.
२२. दररोज गुरुवाणी व अमृतकलश यातील एक पण तरी वाचावे.
२३. संध्याकाळचे स्नान पश्चिमेला तोंड करून सूर्यास्तानंतर करावे. स्नान करताना गंगेचे नाव घ्यावे.
२४. सायंकाळची वेळी लक्ष्मी घरात येण्याची असते. त्यावेळी भांडण, तंटा, रागावणे करू नये. घराच्या कोपऱ्यात कधीही केर ठेऊ नये. कारण लक्ष्मी नेहमी कोपऱ्यात उभी असते.
२५. मुलांना नवीन ठिकाणी, कामाशिवाय रात्री अपरात्री पाठवू नका. तसेच तुम्हीसुद्धा महत्वाच्या कामाशिवाय रात्री अपरात्री फिरू नका. (ग्रहण, व्यतिपात, अमावस्या व पौर्णिमा वर्ज्य)
२६. आपल्या भागात दक्षिण दिशा सर्व कार्याला वर्ज्य समजली जाते. तेव्हा दक्षिणेला तोंड करून अंघोळ तसेच जेवण करू नये. झोपताना सुद्धा दक्षिणेला पाय करून झोपू नये.
२७. रात्री झोपण्यापूर्वी रामरक्षा म्हणावी, ग्लासभर दूध प्यावे. त्यात सुंठ टाकावी. दिवस चांगला गेला यासाठी देवाचे आभार मानून झोपावे. नेहमी सरळ झोपावे, चेहरा आकाशा समोर असावा, पालथे झोपू नये.
२८. संसारामध्ये संयमी राहून आनंदी राहावयास शिकले पाहिजे. काही लोकांना संयमाने वागत येत नाही, ते केव्हाही शक्तीचा व्यय करतात म्हणून संतती दुर्बल व अपूर्ण जन्माला येते.
२९. सोमवार, गुरुवार, शनिवार, व्यतीपात, अमावस्या. पौर्णिमा व उपवासाचे दिवशी मूळ, मघा व रेवती या नक्षत्रांच्या दिवशी ब्रह्मचर्य पाळावे.
३०. लघूशंका बसूनच करावी. उभ्याने करू नये. लघुशंकेला जाऊन आल्यावर एक फुलपात्र भरून पाणी प्यावे.
३१. कधीही घराची दारे बंद करून बसू नका. घरी सतत चार माणसे आली गेली पाहिजेत.
३२. घरामध्ये आपल्याला कितीही प्रिय असलेल्या व्यक्तीचे फोटो त्यांच्या पश्चात लावू नका.
३३. घरात कधीही संपूर्ण काळोख होईल असे करू नका. संपूर्ण घरात निदान मंद उजेड तरी पडलाच पाहिजे.
३४. वयाच्या ५० वर्षापर्यंत संक्रांत-दसरा इ. सारखे सण साजरे करावेत. नंतर अश्या गोष्टीपासून दूर राहावे.
३५. ब्राह्मणांच्या घरात चुकूनही भांडणे, शिव्या-शाप होऊ नये.
३६. देवांच्या आरत्या, श्लोक, टेप-लाऊडस्पिकरवर सतत गाण्यांसारखा लावू नका.
३७. स्त्रियांना योग्य तेथे योग्यतेप्रमाणे मान व महत्व दया. त्यांना अतिमहत्व किंवा त्यांची अतिप्रशंसा करू नये.
३८. तीर्थक्षेत्री गेल्यावर पुजाऱ्यांना, सेवेकऱ्यांना पैसे देऊ नयेत. त्यांना वस्तू द्यावी किंवा मदत करावी. तसेच परस्पर कर्म करायला सांगू नका. स्वतः अभिषेकला बसत जा. सावकाश मंत्रोच्चार करण्यास गुरुजींना सांगा.
३९. प्रदक्षिणा घालताना धीम्या गतीने व शांत व स्थिर चित्ताने कोणाशीही न बोलता घालावी. अशी एक प्रदक्षिणा घातली तरी पुरे.
४०. शिक्षक किंवा वैद्य (डॉक्टर) यांनी कधीही स्थूल असू नये. तसेच हे दोन्ही शास्त्रे असल्याने त्याचे पैसे घेऊ नये. तसेच कलाकारांनी वर्षातील एक दिवस तरी भगवंताची विनाशुल्क सेवा करावी.
४१. सर्व सत्संग मंडळे पुढे अध्यत्मिक केंद्रात बदलणार आहेत. ज्यांना अध्यात्मिक प्रगती कारवायाची आहे त्यांनी कांदा लसूण खाणे सोडावयास हवे.
४२. भक्तांनी देवस्थानात येताना नटूनथटून, दागिने घालून, खूप भडक रंगाचे,निळेत भिजवलेले, गडद निळे-पांढरे कपडे घालून, सुवासिक अत्तरे लावून, स्त्रियांनी पुरुषासारखे केस कापून दर्शनाला येऊ नये. साधेपणाने यावे. हे संन्याशाचे रूप आहे. मला येथे भक्तांनी साधेसुधें विनम्र बुद्धीने आलेले आवडते.
४३. आश्रमात आल्यावर प्रत्येकाने बंधुत्वाचे नाते धरावे. वैर, द्वेष, मत्सर, राग करू नये. बाहेरची नाती येथे धरू नये. फक्त गुरुबंधू / भगिनी (भक्त) एवढेच नाते धरावे.
४४. कोणतीही गोष्ट करताना (सेवा) ती कळकळीने व मनापासून करावी रडतरावू घोड्यावर बसविल्याप्रमाणे करू नका.
४५. बाहेरगावच्या भक्तांनी आश्रमातील सेवकऱ्यांशी तसेच स्थानिक भक्तांशी कामापुरतेच संबंध ठेवावेत. सेवकांना, विद्यार्थ्यांना भेट वस्तू किंवा काहीही देण्याच्या फंद्यात पडू नका. येथील आचार्याशी कोणीही संपर्क साधू नये.
४६. आधी चुका करायच्या मग क्षमा मागायची यात काय अर्थ, मुळात चूकच करू नये. क्षमा मागताना त्यात पद्मतशीरपणा असावा. तो म्हणजे उभे राहून, पाय जुळलेले, हाथ जोडलेले, नम्रता पूर्वक मान खाली करून क्षमा मागावी.

।। श्री गुरुदेव दत्त ।।

Privacy Policy