।। श्रीगणेशदत्तगुरुभ्यो नमः ।।
१) श्रीदत्तात्रेय निवास-
सकाळी ७:०० ते ११:३० पर्यंत.
व दुपारी ३:०० ते सायंकाळी ६:०० पर्यंत.
व आरतीनंतर रात्री ९:०० पर्यंत.
(दुपारची आरती व सायंकाळची आरती आणि दर्शनाची परवानगी आहे.)
२) श्री महालक्ष्मी मंडप अधिष्ठान-
सकाळी ७:०० ते ११:३० पर्यंत
व दुपारी ३:०० ते सायंकाळी ६:०० पर्यंत
व आरतीनंतर रात्री ९:०० पर्यंत.
(सद्यस्थितीतील प्रशासन केवळ उत्सवाच्या प्रसंगी याचे दर्शन सर्वांकरिता खुले करते.)
३) देववृक्ष-
सकाळी ७:०० ते ११:३० पर्यंत व दुपारी ३:०० ते ६:०० पर्यंत
४) श्रीदत्तक्षेत्र-
सकाळी ७:०० ते ११:३० पर्यंत व दुपारी ३:०० ते रात्री ९:०० पर्यंत
५) श्रीसद्गुरु अधिष्ठान (श्रीदत्तक्षेत्र)-
सकाळी ७:०० ते ११:३० पर्यंत दुपारी ३:०० ते सायंकाळी ६:०० पर्यंत
व रात्री आरतीनंतर रात्री ९:०० पर्यंत
६) श्रीनृसिंह सरस्वती तपोवन-
सकाळी ७:०० ते सायंकाळी ८:०० पर्यंत
* रविवार व एकादशीस रात्री ८:३० पर्यंत
(दुपारी १२:०० ते ३:०० यावेळेत देवांची आरती, नैवेद्य व विश्रांती या कारणास्तव मंदिर बंद राहील.)
"गुरुकुल आपला आधार आहे. आपल्या मनाच्या निवा-याची ती पवित्र जागा आहे. येथे योग्य असेच वागावे.- परमपूज्य श्री गुरुदेव
"लौकिक मते आम्ही जातो । ऐसे दृष्टांती दिसतो।
भक्तजनां घरी वसतो । निर्धार धरा मानसी ।।"
- श्रीगुरुचरित्र, अध्याय ५१.
नियम-
१) दर्शनाच्या वेळेतच दर्शनाला जावे.
२) परमपूज्य गुरुदेव हे ब्रह्मचारी व संन्यासी असल्याने दर्शनाला जाताना स्त्री-पुरुष दोहोंचाही पोशाख पूर्ण व गुरुकुलास शोभेल असाच असावा.
३) स्त्रीयांचे केस बांधलेले असावेत, मोकळे सोडू नयेत.
४) दर्शनाला जाताना जेवणात कांदा-लसूण किंवा अभक्ष्य भक्षण व अपेय पान करुन प्रवेश करु नये. दर्शन झाल्यानंतर शक्यतो स्वतःच्या घरी जावे असे सद्गुरु मार्गदर्शन आहे.
५) आश्रमात पोहोचल्यावर वॉचमन सूचना देतील त्याप्रमाणे चामडी बेल्ट व पादत्राणे योग्य ठिकाणी ठेवावीत. व त्यांच्या सूचनांचे पालन करुन सहकार्य करावे.
६) हात-पाय स्वच्छ धुवून शिस्तीत व रांगेत दर्शन घ्यावे.
७) दुपारच्या आरती-प्रसादाला थांबायचे असल्यास तशी पूर्वपरवानगी घ्यावी.
८) वेदपाठशाळेतील विद्यार्थ्यांशी कोणत्याही प्रकारे विनापरवानगी संपर्क साधू नये.
९) देवस्थानाची शिस्त, पावित्र्य व ते अबाधित राखण्यासाठी केलेले नियम हे अध्यात्मिक वातारणासाठी अनुकूल असल्याने त्यावर शंका उपस्थित करू नये अथवा कोणत्याही प्रकारे हुज्जत घालू नये.
१०) मंदिर परिसर हा सर्वप्रकारे स्वच्छ ठेवून सहकार्य करावे.
११) श्रीदत्तदेवस्थान व परिसर हा अध्यात्मिक अनुभूतीचे ठिकाण असल्याने तेथे फोटो काढणे, मोबाईलवर मोठ्याने बोलणे असे पर्यटनस्थळी आढळणारे प्रकार टाळावेत.
।। श्री गुरुदेव दत्त ।।