|| श्रीगणेशदत्तगुरुभ्यो नमः||
परमपूज्य श्री गुरुदेवांचे अमूल्य मार्गदर्शन प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचावे या उद्देशाने सुरु केलेल्या ANDROID APPLICATION बाबत सविस्तर माहिती देत आहोत.
उद्देश- Whatsapp किंवा तत्सम साधनांवर येणाऱ्या पोस्ट आणि इमेजेस असताना APPLICATION सुरु करण्याचा वेगळा प्रयत्न कशासाठी केला? तर Whatsapp वर येणाऱ्या पोस्ट सगळ्यांना साठवून ठेवता येत नाहीत. मोबाईल बिघडला अथवा अन्य काही कारणांनी CHAT HISTORY आणि PHOTO हे DELETE होतात. या सर्व गोष्टी लक्षात घेऊन APPLICATION सुरु केले आहे.
पर्याय- यात मुख्य ४ पर्याय आहेत.
पर्याय क्र.१) सद्गुरूंचे जीवन आणि कार्य- यात परमपूज्य गुरुदेवांच्या कार्याचा थोडक्यात परिचय आणि APPLICATION सुरु करण्याचा उद्देश दिला आहे.
पर्याय क्र. २) नामजप- यात श्री गुरुदेव दत्त आणि दिगंबरा दिगंबरा हा जप दिला आहे. जो APPLICATION बंद करेपर्यंत सुरु राहू शकतो.
पर्याय क्र. ३) स्तोत्रे- या सदरात परमपूजनीय गुरुदेवांच्या आवाजात दोन स्तोत्रे १) गुरुपरंपरा स्तोत्र २) दक्षिणामूर्ती स्तोत्र दिले आहे तसेच परमपूज्य श्री रामकृष्ण स्तोत्र दिलेल आहे.
पर्याय क्र. ४) सद्गुरूवाणी - यात दररोज एका विषयावर परमपूज्य गुरुदेवांचे मार्गदर्शन पोस्ट होत आहे. हा दररोज बदलणारा भाग आहे. ज्यात तुम्ही APPLICATION सुरु झाल्यापासून आजच्या (चालू) तारखेपर्यंतचे सर्व विषय पाहू शकता.
पर्याय क्र. ५) अधिक माहिती व संपर्क- यामध्ये थेट वेबसाईटला जोडण्यासाठी लिंक दिली आहे. वेबसाईटवर अपडेट होणा-या नवीन पोस्ट एका क्लिकवर सर्वांना प्राप्त करुन दिले आहे.
वैशिष्ट्ये-
१) हे पूर्णतः OFFLINE आहे. त्यासाठी कोणतेही internet charge लागत नाहीत. साधारण १ महिन्यानंतर पुढच्या पोस्टसाठी ONLINE UPDATE घावी.
२) या APPLICATION वरील सर्व पोस्ट ह्या जुने अमृतकण आणि जुन्या, अधिकृत परंतु आता सर्वांकरिता उपलब्ध होऊ न शकणाऱ्या ग्रंथांमधून घेतल्या आहेत.
३) मनुष्यत्वाच्या मर्यादांमुळे आणि तत्कालीन मुद्रण चुकांमुळे माहितीमध्ये क्वचित प्रसंगी तफावत जाणवू शकेल. ती सुद्धा जाणवू नये या करिता आम्ही सातत्याने "परमपूज्य गुरुदेवांच्या दीर्घकाळ सहवासात असणाऱ्या गुरुभक्तांचे मार्गदर्शन" घेत आहोत.
४) ह्या APPLICATION चा उद्देश केवळ आणि केवळ परमपूज्य गुरुदेवांचे कार्य जनसामान्यांपर्यंत पोहोचावे, श्री दत्त देवस्थानात पोहोचलेल्या, पोहोचत असलेल्या आणि न पोहोचलेल्या सर्वांनाच परमपूज्य गुरुदेवांचे अमुल्य मार्गदर्शन रोज प्राप्त व्हावे. इतका उदात्त आहे.