आपली भाषा निवडा: घरपोच ग्रंथसेवा




पार्श्वभूमी-
परमपूज्य सद्गुरु श्री रामकृष्ण क्षीरसागर महाराज यांच्या कृपेने वैयक्तिक व कालांतराने समविचारी गुरुबंधू एकत्र येऊन समूहाने २००८ साली गुरुसेवेचे कार्य सुरु झाले. त्यात कधी महाराजांची वचनावली असेल वा घरपोहोच ग्रंथ सेवा असेल. अश्या विविध गोष्टी तंत्रज्ञानाचा वापर करुन सुरु झाल्या. दिवसेंदिवस सद्गुरुकृपेने वाढत जाणारे कार्य व त्यामध्ये येणाऱ्या कायद्याच्या मर्यादा दूर करुन हे कार्य अधिक बळकट करण्याच्या हेतूने गुरुदेवांना प्रार्थना केली तेव्हा त्यांच्या प्रेरणेने व त्यांच्याच आज्ञेने नोंदणीकृत संस्था सुरु करण्याचे निश्चित झाले.

आम्ही कोण आहोत?
श्री रामकृष्ण सेवा प्रतिष्ठान ही परमपूज्य सद्गुरु श्री रामकृष्ण क्षीरसागर महाराजांच्या "दीपासी दीप लाविजे" या परंपरेला अनुसरुन धर्मकार्य आणि वेदकार्य वृद्धींगत करण्याच्या हेतूने पूरक कार्य करणारी अधिकृत नोंदणीकृत संस्था (३०४/२०१८) आहे. परमपूज्य गुरुदेवांच्या अवतार कार्याचा मुख्य भाग म्हणजे धर्म सांभाळणे, धर्म समजावून सांगणे, वेद सामान्य जनांपर्यंत पोहोचविणे आणि वेदांत विचारांवर आधारित धर्माची स्थापना करणे. त्याच बरोबर देवभाषा असणाऱ्या संस्कृत भाषेचे जतन, संरक्षण आणि संवर्धन करणे. या सर्व उद्देशंना पूर्ण करण्याच्या हेतूने या उद्देशांना पूरक उपक्रम राबविण्यासाठी परमपूज्य सद्गुरु श्री रामकृष्ण क्षीरसागर महाराजांच्या कृपेनेच आम्ही कार्यरत गेल्या ८ वर्षांपासून कार्यप्रेरीत आहोत.

संस्थेचे कार्य –
परमपूज्य सद्गुरूंचे अप्रकाशित/ प्रकाशित दुर्मिळ साहित्य संकलित करुन ते सर्वांपर्यंतआधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून पोहोचविण्याचे कार्य गुरुदेव आमच्याकडून करवून घेत आहेत असा आमचा विश्वास व श्रध्दा आहे. तसेच तरुणपिढी व परमपूज्य गुरुदेवांच्या मार्गदर्शनाने उपकृत व कार्याने प्रेरित व्यक्तींचे संघटन करुन कार्य अधिकाधिक व्यापक होण्याच्या दृष्टीने प्रयत्नशील राहणे.

आमचे गेल्या ६ वर्षातील उपक्रम–

  1. वेबसाईटhttp://shriramkrishnakshirsagarmaharaj.com
  2. Mobile Applicationhttps://play.google.com/store/apps/details?id=com.sgd.shreegurudevdatta
  3. YouTube channel-
    अ) गुरुकार्य- https://www.youtube.com/channel/UCZAjk7VjTUw2kR9VCUtJOtQ
    ब) संस्कृत मार्गदर्शन- https://www.youtube.com/channel/UCeF6bVSPHjb3qJvMhvFhN5Q
  4. संस्कृत ग्रंथालय
  5. घरपोहोच ग्रंथसेवा
  6. अनुभव संकलन
  7. साहित्य संकलन

संस्थेमार्फत सुरु होणारे आगामी काळातील उपक्रम-

  1. अधिक समृद्ध आणि व्यापक संस्कृत ग्रंथालय-
  2. एस. एस. सी. परीक्षेत संस्कृत विषयात गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार
  3. परमपूज्य गुरुदेवांच्या मार्गदर्शनावर चिंतन व मनन करण्यासाठी प्रेरित करणाऱ्या स्पर्धा
  4. विविध धार्मिक ग्रंथांवर आधारित स्पर्धा
  5. संस्कृत व्याकरण वर्ग
  6. संस्कृत स्तोत्र पाठांतर स्पर्धा
  7. संस्कृत व आध्यात्मिक विषयांवर चर्चासत्रे

या कार्यात आपण असे सहभागी होऊ शकता-

  1. देणगी- वर्षातून एकदा (गुरुपौर्णिमा, श्री दत्त जयंती अथवा तुम्हाला सोयीची कोणतीही तिथी) कमीतकमी रुपये ११००/- (म्हणजे महिन्याला १०० पेक्षाही कमी) या कार्यासाठी देणगी म्हणून देऊ शकता. त्याची रीतसर पावती दिली जाईल.
  2. इतर सहकार्य- संस्थेमार्फत सुरु असणाऱ्या विविध कामांसाठी मोठ्या प्रमाणावर टायपिंग, ग्रंथ संकलन इत्यादीसाठी मनुष्यबळ आवश्यक असते. तसेच संस्थेमार्फत होणाऱ्या विविध उपक्रमांना यशस्वी करण्यासाठी कार्यकर्ते आवश्यक असतात. आमच्या कार्यात आपण सहभागी होऊ इच्छिता? – ७०९८ ७७० ७७० या संस्थेच्या Whatsapp क्रमांकावर (मेसेज/कॉलद्वारे) संपर्क करु शकता.

आवाहन
आगामी काळात हे उपक्रम यशस्वीपणे कार्यान्वित राहण्यासाठी आर्थिक व मानवी सहकार्याची नितांत आवश्यकता आहे. आपण संघटीत होऊन केलेले हे कार्य पुढील अनेक पिढ्यांना परमपूज्य गुरुदेवांच्या साहित्याचा, संस्कारांचा आणि उदात्त विचारांवर आधारित परंपरांचा ठेवा उपलब्ध करुन देणारे ठरेल. तसेच लोकसंपर्क दृढ होऊन "प्रेमसंकलनाचे कार्य" देखील जोमाने होईल. आणि असे कार्य नक्कीच परमपूज्य सद्गुरूंना आनंददायी ठरेल!

॥ श्री गुरुदेव दत्त ॥

Privacy Policy