आपली भाषा निवडा: घरपोच ग्रंथसेवा




"अध्यात्म"
परमपूज्य श्री रामकृष्ण क्षीरसागर महाराज यांनी "अध्यात्म" या विषयी केलेले मार्गदर्शन-


भारत हा ऋषिमुनींचा देश आहे आणि ऋषिमुनींच्या ह्या देशामध्येत्यातल्या त्यात महत्वाचा भाग काय आहे? गुरुपरंपरा असणारा देश म्हणजे काय असूशकेल? त्याला विवेक असू शकेल, वैराग्य असू शकेल. भारत या शब्दाचा अर्थ "भा" म्हणजेज्ञान असलेले लोक. म्हणून या देशाला भारत हे नाव आहे. "अध्यात्म विद्या विद्यानाम्" असे आपण मानतो. अध्यात्म विद्येचा शोध कोणी घ्यायचा आहे किंवा तो कोणाला लागू शकेल तर, तो भारत या देशाला लागतो आणि अध्यात्मविद्येच ज्ञान केंव्हा होत, तर गुरुज्यावेळेला आपल्याला उपदेश करतील, ते अनुग्रहित करतील, ज्ञान देतील तेंव्हा. त्यांच्या या अनुग्रहाने, त्यांच्या स्पर्शाने, आपल्याला आपोआप ज्ञानाची प्राप्ती होईल. तसा विचार केला तर "अध्यात्म म्हणजेपोथी पुरण नसून, अध्यात्म म्हणजेशरीर. आपल्या ठिकाणी कोणाचा वास आहे, आपल्याला सजीवत्व कोणामुळे आहे त्याचा अभ्यास करणे शोध घेणे म्हणजे अध्यात्म". त्या ईश्वराचा वास या नरदेहात पाहायला सापडतो. ज्या ज्या ठिकाणी सजीवपणा दिसतो, तिथे ईश्वराचा वास आहेच. विशेषतः भारतीय लोकांना, आपल्या ठिकाणी ईश्वराचा वास आहे, याचं ज्ञान झालेलं आहे.

*संदर्भ-गुरुवाणी पुष्प ११वे
।। श्री गुरुदेव दत्त ।।

Privacy Policy