आपली भाषा निवडा: घरपोच ग्रंथसेवा


जीवनामध्ये सद्गुरु लाभणे फार महत्वाचे असते. त़्यात परमपूज्य सद्गुरु श्रीरामकृष्ण सरस्वती (क्षीरसागर महाराज) यांसारखे सद्गुरु लाभणे फारच भाग्याचे आहे.


केवळ महाराष्ट्रालाच नव्हे तर संपूर्ण भारतवर्षाला भूषण ठरावं असं हे व्यक्तिमत्व अहमदनगरमधील सावेडी मार्गावरील वेदांत नगरात शक्तिरुपाने वास्तव्य करुन आहेत. आपल्या सगळ्यांचे सद्गुरु परमपूज्य श्रीरामकृष्ण सरस्वती (क्षीरसागर महाराज) हे आपणांस परमेश्वर स्वरूप आहेत. सद्गुरुंना त्यांच्या गुरुंनी वेदांचे कार्य हाती दिले, हे आपणा सर्वांना परिचित आहे.

चला, तर मग फुल ना फुलाची पाकळी आपणही या कार्यात काही हातभार लाऊया. चिंतामणी पादूकांच्या रुपात भगवंतांचा प्रत्यक्ष वास असणारे श्रीदत्तात्रेय निवास, वेदाध्ययन आणि अध्यापनाची वेदांत इमारत, नीलवर्णकांतीने पावन महालक्ष्मी मंडप, तपोवन आणि श्रीदत्तक्षेत्र ह्यांचे महात्म्य तसेच सद्गुरुंनी आपल्यासाठी ज्ञानामृत व आशीर्वाद दिले आहेत. त्या ज्ञानगंगेने आपण पारमार्थिक प्रगती साधून सद्गुरु कृपेचा अनुभव घेऊ शकतो. परमपूज्य सद्गुरुंच्या "दीपासी दीप लाविजे", परंपरेस अनुसरुन, आपणही ह्या कार्यास हातभार लावूया. सद्गुरुंचे आशीर्वाद, उपदेश, गुरुभक्तांचे अनुभव आपण इतरांपर्यंत पोहचवू. तुम्ही आहात ना आमच्या बरोबर…

ही वेबसाईट अद्ययावत व परिपूर्ण होण्याच्या दृष्टीने आपल्या सर्वांच्या सूचना व सहकार्य यांचे स्वागत आहे.

।। श्री गुरुदेव दत्त ।।

Privacy Policy