आपली भाषा निवडा: घरपोच ग्रंथसेवा




"नास्तिक"
परमपूज्य श्री रामकृष्ण क्षीरसागर महाराजांनी "नास्तिक" या विषयावर केलेले मार्गदर्शन-


नास्तिक म्हणजे ज्याला वेदपरंपरा मान्य नाही तो. सर्वसामान्यपणे आपण असा अर्थ घेतो की, ईश्वराला न मानणारे म्हणजे नास्तिक. ईश्वर आहे किंवा नाही याचा सामान्य माणसाने विचार करण्याची जरुरीच नाही. सामान्य माणसाचा तो विषय नाही. कारण ईश्वर आहे म्हणण्याने त्याचे अस्तित्व प्रगट होणार नाही की ईश्वर नाही असे म्हणण्यानेही काही विपरीत होणार नाही. सामान्य माणसाची तशी पाञता नसते की जेणे करुन त्यांना ईश्वराच्या अस्तित्वाचा अनुभव येईल. तुम्ही कितीही म्हटले की ईश्वर नाही, ईश्वर नाही तरी तो तुमच्या समोर येऊन म्हणणार नाही की मी आहे बरं कां! पंढरपूरला हजारो भाविक देवदर्शनासाठी जात असतात. त्यांच्या मनात पांडुरंगाबद्दल अपार श्रध्दा असते. ईश्वर मानणारेते असतात. पण म्हणून काही ईश्वर प्रगट होऊन त्यांना म्हणत नाही की, मी इथे आहे. ईश्वराबद्दल केवळ शाब्दिक व शुष्क चर्चा करण्याचे कारण नाही. जे वायफळ बोलतात त्यांच्या बोलण्याला काही किंमत नसते. ज्यांना अनुभव असतो तेच अधिकारवाणीने ईश्वराविषयी सांगू शकतात. त्यांच्याच बोलण्याला किंमत असते. ज्यांना चांगले बोलता येते त्यांनी ईश्वराविषयी चांगले बोलावे. एवढेच पुरेआहे. मनुष्याला ईश्वरदर्शनाची ओढ असते, त्याच्यात सात्विक वृत्ती असते हे ईश्वराच्या श्रेष्ठत्वाचेच लक्षण आहे. प्रत्येकाने नेहमी चांगला विचार करावा. एवढे सामान्य तत्त्व तरी आपण पाळले पाहीजे. ईश्वर तुम्हाला कधीही सांगत नाही की, माझे नाव घ्या. जो ईश्वराचेनाव घेतो त्याला ईश्वर सांभाळतोच. पण जो नाव घेत नाही त्यालाही ईश्वर सांभाळतो. माञ जो नाव घेतो त्याला सद्गती प्राप्त होत असते हे निश्चित.

प. पू. श्रीरामकृष्ण सरस्वती क्षीरसागर स्वामीमहाराज.
।। श्री गुरुदेव दत्त ।।

Privacy Policy