आपली भाषा निवडा: घरपोच ग्रंथसेवा


परमपूज्य सद्गुरू श्री रामकृष्ण क्षीरसागर महाराज यांनी “गुढीपाडव्या” विषयी केलेले मार्गदर्शन-

हिंदूंचे नवीन वर्ष चैत्रातील “गुढीपाड्व्यापासून” सुरु होते. सर्व ऋतूंचा राजा वसंत ऋतू ह्या दिवसापासून सुरु होतो. दिवाळीच्या सणातील बलिप्रतिपदेला देखील पाडवा म्हणतात.

दिवाळीतील पाडवा व चैत्रातील गुढीपाडवा याचे वेगळेपण गुढीपाडवा या शब्दातूनच दिसून येते. दिवाळीत येणाऱ्या पाडव्यापासून राजा विक्रमादित्यांनी सुरु केलेल्या वर्षाची “विक्रमसंवत” शकाची सुरुवात होते. तर ह्या पाडव्यापासून शालिवाहन राजाने सुरु केलेल्या वर्षाची शालिवाहन शकाची सुरुवात होते.

या दिवसाला पौराणिक महत्त्व देखील आहे.

१) ब्रह्मदेवाने हे जग चैत्र शुद्ध प्रतिपदेला निर्माण केले आहे.

२) जगातील दुष्टांचा नाश करून सज्जनांचे रक्षण करण्यासाठी विष्णूने अगदी पहिल्या प्रथम ह्याच दिवशी अवतार घेतला.

३) प्रभू श्रीरामचंद्रांनी वालीच्या जुलमी सत्तेतून त्याच्या प्रजेला ह्याच दिवशी सोडवले होते. व चौदा वर्ष वनवास भोगल्यानंतर प्रभू रामचंद्र ह्याच दिवशी अयोद्धेत परत आले. म्हणून जनतेने आनंदोत्सव साजरा करताना सर्वत्र घरावर गुढ्या उभारल्या होत्या, त्याचे स्मरण म्हणून आपण गुढीपाडवा साजरा करतो.

।। श्री गुरुदेव दत्त ।।

Privacy Policy