आपली भाषा निवडा: घरपोच ग्रंथसेवा



।। श्री गणेशदत्तगुरुभ्यो नमः ।।


प्रत्येक भक्ताला वाटत असते कि आपल्याला गुरुप्रसाद प्राप्त व्हावा. प्रसाद म्हटल्यानंतर प्रत्येकाच्या डोळ्यासमोर कोणती तरी वस्तू येते. मग ती खाण्याची असेल किंवा इतर वस्तू असेल. गुरुप्रसाद नुसत्या वस्तूच्या रुपातच नसून इतर दुसऱ्या कोणत्या तरी स्वरूपातही असू शकतो. प्रसाद म्हणजे केवळ नैवेद्याचा प्रसाद किंवा जेवण इतका संकुचित अर्थ न घेता प्रसाद म्हणजे आनंद मिळणे किंवा तृप्तता प्राप्त होणे होय. प्रसाद म्हणजे परमेश्वराचा पाठिंबा असणे.

आश्रमात आल्यावर परमेश्वराच्या पाठिंब्याची अपेक्षा असेल तर आपले वागणेही चांगले असावे. हि स्थाने पवित्र आहेत व पवित्रच राहू द्या. आमचे या ठिकाणी वास्तव्य आहे. अती कष्ट करून आम्ही या ठिकाणी अधिष्ठान निर्माण केलेले आहे. सामान्य लोकांना ह्याचा फायदा व्हायलाच पाहिजे हि देवांची इच्छा आहे. हे एका व्यक्तीसाठी नसून सर्वांसाठी खुले आहे. गुरु हि व्यक्ती नसून तत्त्व आहे. हि परंपरा जेथे वास करून आहे तेथेच दर्शनाला जायला पाहिजे. भक्त बाहेरून कितीही वणवण करून आलेले असले तरी दर्शनाला आले कि त्यांच्या मनाला शांतता व समाधान मिळायला पाहिजे व आनंदच वाटला पाहिजे. म्हणूनच आम्ही आमचे पावित्र्य सांभाळतो. तेव्हां तुमच्याकडूनही येथील नियमांप्रमाणे वागण्याची अपेक्षा असते.


।। श्री गुरुदेव दत्त ।।

Privacy Policy