आपली भाषा निवडा: घरपोच ग्रंथसेवा


प्रश्न. गाणगापूरहून परत जातांना डायरेक्ट घरी जावे. इतर ठिकाणी (म्हणजे तुळजापूर, पंढरपूर वगैरे) जाऊन घरी गेले तर चालेल का?


उत्तर. प. पू. महाराजांनी खुलासा केला कि, जेव्हा गाणगापूरांत जाता तेव्हा सिद्धभूमीमध्ये प्रवेश करता. तेव्हा प्रत्येकाने स्वतःच्या मनाशी नक्की करावे की रोज इतक्या प्रदक्षिणा करीन, रोज इतके ध्यान करीन वगैरे त्याप्रमाणे पूर्ण केल्यानंतर मनाला एक प्रकारचे मानसिक समाधान मिळते. ज्या ज्या वेळेला वेळ मिळेल त्या वेळेला नामस्मरण करा किंवा वाचन करा. आपापसात गप्पा मारून वेळ दवडू नका. किंवा कोणत्या हॉटेलमध्ये चहा वडे चांगले मिळतात ह्याची चर्चा करू नका. गाणगापूरमध्ये असताना आमचा सहवास मिळतो. तेव्हा तुमचे मनावर चांगले संस्कार झालेले असतात. गाणगापूरहून निघाल्यानंतर येताना प. पू. महाराजांनी काय काय सांगितले ह्याची आठवण मनात असते. गाणगापूरातील सहवासाची आठवण व तेथील दिव्य किरण तुमचे बरोबर येत असतात. त्या शिवाय ह्या गोष्टीशी तुमचे मनांतील विचार देखील एकरूप झालेले असतात. अशा रीतीने डायरेक्ट घरी आले असताना ती दिव्य किरणे घरी येतात. हा ठेवा रोज आठवणींनी वर्षभर पुरतो. जर तुम्ही पंढरपूर, तुळजापूर किंवा इतर ठकाणी गेलात तर विचार मालिका तुटते व त्या ठिकाणाचे वातावरणाशी विचार जोडले जातात. गाणगापूरची आठवण अस्पष्ट होऊन जाते. गाणगापूरहून निघालेली तुमचे घरी येणारी दिव्य किरणे येऊ शकत नाहीत. अशा रितीने नकळत तुमचे नुकसान होते. गाणगापूरला येण्या अगोदर तुळजापूर, पंढरपूर किंवा ज्या ठिकाणी जायचे असेल तेथे जाऊन या. परंतु गाणगापूरहून परत जातांना डायरेक्ट घरी जा. (खंडः २)


।। श्री गुरुदेव दत्त ।।

Privacy Policy