|| श्री गणेशदत्तगुरुभ्यो नमः ||


आपली भाषा निवडा: घरपोच ग्रंथसेवा


प्रश्न: कोणतेही काम करावयास घेतले तर अनेक शंका कुशंका का येतात?


उत्तर: प. पू. महाराजांनी खुलासा केला की, प्रत्येक सामान्य व्यक्तीमध्ये कमी अधिक प्रमाणात दुर्बलता असते. म्हणूनच ते सामान्य राहीलेले असतात. जर ही मानसिक दुर्बलता दूर केली तर भराभर प्रगती होऊ शकेल. कोणतेही काम करावयास घेतले तर अनेक शंका येणे हा उणेपणाच आहे. स्वतःचा स्वतःवर विश्वास नसणे हे त्याचे लक्षण आहे. हे दूर करता येते. आपल्यापेक्षा अनुभवाने जे श्रेष्ठ असतील त्यांचे नेहमी ऐकावे. त्याचे नेतृत्व मान्य करावे. त्याशिवाय जे गुरू आपल्याला मार्गदर्शन करतील त्यांचे ऐकावे. त्यांचेबद्दल मनांत शंका येऊ नये. जर गुरुबद्दल शंका व्यक्त केली तर आपण किती खालचे पातळी पर्यंत उतरतो हे लक्षात घ्यावे. ज्यांना ह्या शंका दूर करता येत नाही. त्यांनी प्रगतीची अपेक्षा करू नये. सरळ आपली नोकरी धरावी. दरमहा ठराविक पगार तर मिळेल. ऑफिसला जाणे येणे व ठराविक चाकोरीचे जीवन जगावे. जास्त फास्ट प्रगतीची अपेक्षा करू नये. (खंडः२, अमृतकण- २. १. १९८३)


।। श्री गुरुदेव दत्त ।।