प्रश्न: वारंवार संकटातून काही ना काही मार्ग दाखविला तर परमेश्वराच्या अस्तित्वाबद्दल
आपल्या मनात शंका असतात, आपली सुटका होईपर्यंत आपण मानतो व नंतर पुन्हा शंका सुरु असे
का व्हावे?
उत्तर: परमेश्वर दयाळू आहे, तो आपली संकटातून मुक्तता करीत असतो. त्यानंतर सुद्धा त्याच्या
अस्तित्वाबद्दल शंका येतात. त्याचे कारण म्हणजे स्वार्थ हा आहे. स्वार्थीपणामुळे मानव
साशंक असतो. हे रजोगुणाचे लक्षण आहे. रजोगुणाचा मूळ स्वभाव स्वार्थ वाढविणे आहे. त्यामुळे
मनाचा तोल जातो. त्यामुळे दृष्टीला सुद्धा एक प्रकारचे अंधत्व येते. त्याला सत्य परिस्थिती
लक्षात येत नाही. मनुष्य अशा रीतीने वारंवार शंका व्यक्त करीत बसला व ईश्वराच्या अस्तित्वाबद्दल
साशंक राहिला तर त्याचा नाश होतो. भगवंताच्या क्षमेला सुद्धा मर्यादा आहेत, ती मर्यादा
एकदा ओलांडली कि नाश नक्की आहे. मनुष्यामध्ये सात्विक गुण असला कि तो परमेश्वराबद्दल
साशंक राहत नाही. परमेश्वर सर्वत्र आहे असे तो मानतो. तमोगुणाचा प्रभाव असलेला मनुष्य
स्वतःचेच कर्तृत्व मानतो. तो हेतू साध्य होईपर्यंत परमेश्वराला प्रार्थना करीत असतो.
नंतर मीच केले, देव थोडा करायला आला अशी फुशारकी मारीत असतो. (भगवान श्री दत्तोत्रेय
सत्संग मंडळ; मुंबई, मार्च ८३)