आपली भाषा निवडा: घरपोच ग्रंथसेवा


प्रश्न: भक्ताने भक्ती कशा तऱ्हेने करावी व गुरु कसे निवडावे? खरे गुरु कसे वागतात?


उत्तर: परमात्म्याचा अनुभव येवो कि न येवो भक्ताने सात्विक गुण वाढावयास पाहिजेत, भक्तांमध्ये निव्वळ श्रद्धा असून उपयोग नाही. श्रद्धेबरोबर कर्तव्य असले पाहिजे. श्रद्धेबरोबर कर्तव्य असले की अनुभव येतो. नुसती श्रद्धा स्वार्थाकडे वळवते. कर्तव्य व श्रद्धा एकत्र असले कि उज्वल स्तिथी प्राप्त होते. काही लोक म्हणतात, आम्ही या देवाला जातो, त्या देवाला जातो, त्यालाच ते श्रद्धा म्हणतात. परंतु अशा रीतीने परिपूर्णता होत नाही. आपल्या कृतीमध्ये भाव, कर्तव्य, श्रद्धा असली पाहिजे.
गुरु योग्य आहे का हे शिष्याने तपासले पाहिजे. जशी जशी शिष्याची पात्रता वाढत जाईल तसतसे त्याला योग्य गुरु भेटतात. गुरु तत्वपरायण योग्यतेचे असले पाहिजेत. जर असे गुरु नसतील तर शिष्याचा श्रद्धेला काहीही किंमत नाही. योग्य गुरु भेटतात तेव्हा शिष्याने मागितले कि गुरूने द्यावे असे नसते. गुरु तुम्हाला योग्य काय आहे ते देतात. शिष्याने यथा योग्य तथा गुरु असे मानावे. ऐश्वर्य भोगण्याची योग्यता असेल तर ऐश्वर्य मिळेल. सद्गुरूच्या चरणांचे दास होण्याची योग्यता असेल तर आम्ही गुरुचरणाचे दास होऊ अशी भावना भक्ताने ठेवली पाहिजे. खरे गुरु शिष्याचे ऐकत नाहीत.

आपल्या गुरूंकडे गेल्यानंतर जीवनाकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलला पाहिजे. आपण अमुक कार्यासाठी गुरूंकडे गेलो व कार्य पूर्ण झाले तर ठीक झाले नाही तर दुःख मनू नये. असेच मानले तर गुरुकृपा करतात. कृपा म्हणजे पोरखेळ नव्हे. गुरु स्वतः तेजस्वी असावे लागतात तेव्हा ते तुमचा जीवनात तेज आणू शकतात. गुरु नेहमी भक्तांना तपासतात. ते आपल्या दुष्टीकोनातून आपल्या भक्तांकडे पाहतात. त्यांची क्षमता तपासतात. जोपर्यंत साक्षात्कारी गुरु भेटत नाहीत तोपर्यंत शिष्याच्या मनात गोंधळ कायम राहतो. (भगवान श्री दत्तोत्रेय सत्संग मंडळ; मुंबई, मार्च ८३)


।। श्री गुरुदेव दत्त ।।

Privacy Policy