आपली भाषा निवडा: घरपोच ग्रंथसेवा


प्रश्न: मनुष्य भ्रमिष्ट व वेडा का बनतो?


उत्तर: प. पू. महाराजांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, ज्या घराण्यात भ्रमिष्ट व वेडा मुलगा जन्मतो त्याचा कधी विचार केला का? त्याचे संपूर्ण घराणे वेडे नव्हते किंवा त्या घराण्यात पूर्वी वेडी मुले जन्मली नव्हती किंवा त्या वेड्याचे आई वडीलही वेडे नव्हते. तीन चार भावांपैकी एखादाच वेडा बनतो. अंध आई बापाचे पोटी देखील डोळस मुले जन्म घेतात परंतु चांगल्या आई बापाचे पोटी एखादाच मुलगा वेडा का जन्मतो? प्रत्येक व्यक्तीने स्वतःच्या मनांत ईश्वराचे सार्वभौमत्व मानले पहिजे. त्याचे अधिष्ठान असणे आवश्यक आहे. कोणत्याही देवावर श्रध्दा ठेवली तरी चालते. परंतु कुठेतरी श्रध्दा व विश्वास हा ठेवलाच पाहिजे. जर तुम्ही असे केले नाही तर मन कमकुवत बनते व पुढे मनुष्य भ्रमिष्ट व वेडा बनतो. तुम्ही रोज जी काही थोडी थोडी उपासना करता त्यामुळे तुमचे मनाला थोडी शांती व समाधान मिळत असेल परंतु ते तात्पुरते असते. तुमचे मनाविरुध्द गोष्ट घडली तर तुम्हांला ताबडतोब संताप येतो व राग येतो. मन उचंबळून येते. मन उद्विग्न होते. असे का घडते? तुमची उपासना कमी पडते. तुमची श्रद्धा व भाव कमी आहे. जो वाढावयास पाहिजे. आपल्याला परमविशिष्ट शांती प्राप्त करावयाची आहे. ती आत बाहेर वेगळी असते. त्या स्थितीला जाणे अवघड आहे परंतु तेथे पोहोचता येते हे निश्चित! (खंड २)


।। श्री गुरुदेव दत्त ।।

Privacy Policy