|| श्री गणेशदत्तगुरुभ्यो नमः ||


आपली भाषा निवडा: घरपोच ग्रंथसेवा


प्रश्न: आम्ही संसारी व प्रंपचवाईक आहोत. आम्ही उपासना कशी करावी?


उत्तर: प. पू. गुरूदेवांनी खुलासा केला की, तुम्ही प्रपंचवाईक आहात हे बरोबर. कोणीही संसार सोडायचा नाही. प्रपंच करतानाच तुम्हांला जो काही वेळ मिळतो तो अतत्वार्थ चर्चा व विनाकारण काथ्याकूट न करता तो योग्य मार्गी सत्कारणी लावा. प्रपंच करताना देवाचे स्मरण व मनातल्या मनात जप करणे चांगले. परतूं परमार्थासाठी जितका वेळ घ्यावा त्यावेळी प्रपंंचाची आठवण नको. त्यावेळी तुमचे मनात दुसरे कोणतेही विचार नकोत. तुमचे मनाला अनेक दोष चिकटून बसलेले असतात. ते प्रयत्नांनी दूर करता येतात. परमार्थ करताना प्रपंचाचे आठवणीने अडथळे निर्माण होतात. त्यामुळे मन एकाग्र होऊ शकत नाही. दिवसात अर्धा तास किंवा एक तास जितका वेळ जमेल तितका वेळ परमार्थासाठी खर्च करा. मन एकाग्र होण्यासाठी एकभाव होणे आवश्यक आहे. चांगले विचार येण्यासाठी गुरूस्मरण करा. आपण सेवा करणारे कोण? देवासमोर आपण शुद्रच आहोत. आमची सेवा करायची तयारी आहे. देवा आमचेकडून तुम्ही सेवा करवून घ्या. अशी भावना नेहमी ठेवावी म्हणजे आमची किरणे तुमचेकडे येतात. तुम्ही रोज पहाटे उठून साधना करता, तुम्हांला वाटते की तुम्ही सर्व करता, परतू्ं असे नसून जेव्हा तुम्ही ख-या मनाने, निश्चयाने उपासनेस बसता, तेव्हाच आमची किरणे तेथे येऊन तुमचेकडून साधना करून घेतात. त्यामुळे तुमची रोज प्रगती होत जाते. एखादी अवघड गोष्ट साध्य कशी होते? आपोआप तर काही होत नाही. कुठूनतरी बाहेरून मदत येते, नंतरच काम यशस्वी होते. दृढ भाव पक्का ठेवा. मनातील संशय कमी करा म्हणजे तुमची प्रगती निश्चित होईल. (खंड २, पान नं- २३६)


।। श्री गुरुदेव दत्त ।।