|| श्री गणेशदत्तगुरुभ्यो नमः ||


आपली भाषा निवडा: घरपोच ग्रंथसेवा


प्रश्न: एका भक्ताने विचारले की, जप करतांना लक्ष लागत नाही.


उत्तर: प. पू. महाराजांनी मार्गदर्शन केले की, तुमचे मनावर मागील अनेक जन्माचे वेडेवाकडे संस्कार झालेले आहेत. दोषांचा ढीग जमलेला आहे. ते काढणे आवश्यक आहे. कपडे धुतांना पाणी किती वाया गेले ह्याचा हिशोब नको, कपडे धुतांना साधे पाणी, गरम पाणी, नंतर सोडा, नंतर नीळ व इतर केमिकल्स टाकून कपडा स्वच्छ करण्यासाठी प्रक्रिया कराव्या लागतात. त्याचप्रमाणे मनाचे आहे. प्रयत्न नित्याने केले पाहिजे. म्हणजे मनांतील ही घाण हळू हळू कमी होईल. उपासनेला सुरुवात केल्यानंतर सुरुवातीच्या काळांत इतर विचार मनांत सैरावैरा धावपळ करतील. मन एकाग्र होऊ देत नाही. परंतु अशा गोष्टीने घाबरुन किंवा गांगरुन जाऊ नका. सुरुवातीला असे विचार येणारच. त्यांना येऊ द्या. त्याला दाबू नका. उपासनेतील काही वेळ मनाला जाणीव देऊन मन मोकळे ठेवण्यास प्रयत्नपूर्वक शिका. अशा रितीनेच तुमची प्रगती होऊ शकेल. पुष्कळ वर्षे उपासना केली, मनाला शांती मिळाली नाही. चला दुस-या गुरुंकडे, असे कधीही करु नका. तुम्ही जेथे आलात आता येथेच स्थिर व्हा. कितीही बोळी बोळीतून हिंडत राहिले तर फार चालून थकल्यासारखे होईल व पुन्हा होतो त्याच जागेवर याल. मुख्य रस्त्याला, योग्य मार्गाला लागणार नाही. जोपर्यंत तुम्हांला योग्य मार्गदर्शनाचा रस्ता सापडत नाही तोपर्यंत प्रवास सुखकर होणार नाही. मी जर तुम्हाला खाली डोके, वर पाय करावयास सांगत असेन तर लोक तुम्हांला हसतील. परंतु उपासना केल्यास, देवांचे नाव घेतल्यास, स्मरण, जप केल्याने असे होणार नाही. आपण मात्र मनांत भय न ठेवता उपासना करावी. (खंड २)


।। श्री गुरुदेव दत्त ।।