प्रश्न: स्वतःहून उपासना करणा-यांना यश का मिळत नाही?
उत्तर: प. पू. गुरूदेवांनी खुलासा केला की, आजकाल बाजारात पुष्कळ ग्रंथ व पुस्तके विकत
मिळतात. काही सुशिक्षित लोकांना अनुभवी गुरूंना विचारून मार्ग नक्की करण्याची लाज व
संकोच वाटतो. तेव्हा कोणालाही न विचारता, स्वःता पुस्तकांत वाचून उपासना नक्की करतात.
अशा उपासनेने काहीच प्राप्त होत नाही. स्वःताचे हाल होतात, त्याचबरोबर घरच्यांचेही
हाल होतात. सुख व शांती मिळत नाही. अश्या त-हेने जीवन निष्फळ होते. चूकीच्या प्रयत्नाने
साधे मानसिक समाधानही मिळत नाही. पूढे पूढे हे लोक नास्तिक बनतात. अनेक वर्षे उपासना
करीत होतो, परतूं कशाचीही प्राप्ती झाली नाही, साधी शांती मिळाली नाही, असा प्रचार
करतात. आपली आस्तिक वृत्ती नीट वापरावी. जर कोणी योग्य गुरू भेटले नाहीत तर चिंतन व
स्मरण करा. जर क्षमता व कुवत असेल तर उपासना करा. आपली उडी किती लांब जाऊ शकते हे ज्याचे
त्याला समजते. जर देवांना दया अाली तर ते योग्य गुरूंची भेट घालून देतात. एकदा गुरू
भेटल्यानंतर सर्वच मार्गांची उकल होत जाते. गुरू हे ईश्वराचे अवतार मानले जातात ते
शिष्याची क्षमता पाहून मार्गदर्शन करतात व उपासना सांगतात. गुरू कधीही अयोग्य उपासना
सांगणार नाही. काही भक्तांना सर्व बाजूंचा विचार करून विशिष्ट उपासना करावयास सांगतात.
समोरची व्यक्ती पाहिल्याबरोबर त्याची कुवत महाराजांना समजते. मी रोज तुम्हांला जेवढे
पचेल तेवढे थोडेथोडे शिकवतो. तुम्ही त्याचे चिंतन करा व मनन करा. त्यावर विचार करा.
स्वःताच्या जीवनांत बदल घडवून घ्या व रोज प्रगती करा. जर तुम्ही काहीच केले नाही तर
वेळ निघून जाईल. नंतर पश्चात्तापाची पाळी येईल. मानव जन्म पुन्हापुन्हा मिळत नाही.
मानव जन्म मिळूनही योग्य गुरूंची भेट होत नाही. तुमचे सुदैवाने तुम्हांला ईश्वर अनुग्रहीत
गुरू भेटलेले आहेत. प्रत्येक भक्ताला स्वःताची प्रगती करवून घेण्यास पूर्ण संधी दिलेली
आहे. त्याचा योग्य उपयोग करून घ्या व काही तरी प्राप्त करा. (खंड- २, पान नं- २२५-२२६)