प्रश्न: हवेतील प्रदूषण कमी कसे करावे?
उत्तर: प. पू. महाराजांनी खुलासा केला की, घराचे आजूबाजूला तुळस लावावी जर जागा नसेल
तर कुंड्यातून तुळस लावावी. इतर झाडे दिवसा कार्बनडाय ऑक्साईड वायू घेतात व ऑक्सिजन
वायू सोडतात. म्हणून आपल्याला दिवसा निसर्गाच्या सान्निध्यांत आंनदीपणा वाटतो. रात्री
हीच झाडे उलट प्रकारे म्हणजे ऑक्सिजन वायू घेतात व कार्बनडाय ऑक्साईड वायू सोडतात.
परंतु तुळस ही एकच अशी वनस्पती आहे की, दिवसाचे २४ तास कार्बनडाय ऑक्साईड वायू घेते
व ऑक्सिजन वायू सोडते. त्याशिवाय शुद्ध तुपाचा दिवा हवेतील प्रदूषण कमी करतो. त्याशिवाय
कापूर वगैरे हवेतील प्रदूषण कमी करतात. आपल्या पूर्वजांनी धार्मिक रूढी निर्माण केलेल्या
आहेत. त्यांत शास्त्राचा विचार केलेला आहे. म्हणून आपण देवापुढे धूप, दीप, नेवैद्य
व तुपाचा दीवा करतो. ज्या घरांत धूप, दिव्याची पद्धत नाही, त्यांनी ह्या गोष्टी सकाळ
संध्याकाळ करावयास हरकत नाही. १-२ महिन्यात तुम्हांला घरातील वातावरण एकदम प्रसन्न
वाटेल. कापूर, धूप व सुगंधी अगरबत्तीच्या सुवासाने घरांत कोणत्याही वाईट गोष्ट येऊ
शकत नाही. (खंड २)