आपली भाषा निवडा: घरपोच ग्रंथसेवा


प्रश्न: तरतरीतपणा कायम राहण्यासाठी व वाढविण्यासाठी काय करावे?


उत्तर: प. पू. महाराजांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, मनुष्याला तरतरीतपणा केव्हा वाटतो, जेव्हा तो विश्रांती घेतो तेव्हा. रात्री झोपून उठल्यानंतर त्याला सकाळी काम करायला चांगला उत्साह वाटतो परंतू हा उत्साह दिवसभर टिकत नाही. तो फार लवकर दमतो. कारण शक्ती कमी पडते. समान्य मनुष्याला उत्साह वाढविण्यासाठी विश्रांतीचा आधार घ्यावा लागतो. जसे दगडी कोळसा व लाकडी कोळसा जळण्यात फरक पडतो. ही शक्ती वाढविण्यासाठी ध्यान धारणा करवयास पाहिजे. ध्यान धारणा केल्याने शक्ती वाढते व जास्त वेळ टिकते. ध्यान धारणा केल्याने योजनापूर्वक काम करता येते. अधिक वेळ एकाग्रतेने काम करता येते. सामान्य मनुष्याने जर ध्यान धारणेचा आधार घेतला तर त्याला शक्ती कमी पडणार नाही. दिवसभर उत्साह रहातो. माणूस थकत नाही. जे जे भक्त ध्यानधारणा करतात त्यांना हा अनुभव आला असेल. मनुष्याची शक्ती व्यर्थ बडबड केल्याने फार खर्च होते म्हणून मोजकेच बोलण्याची सवय ठेवावी. हा शक्ती संचय काटकसरीने खर्च करावा. ज्यांना बुध्दीचे काम करावयाचे आहे, एकाग्रतेने काम करण्याची गरज आहे त्यांनी हे नियम कटाक्षाने पाळावे. ज्यांना बुध्दीचा उपयोग कमी करुन शारीरिकरीत्या कष्ट जास्त करण्याची सवय ते दिवसभर कष्ट करुन शारीरिक दमतात व रात्री अन्न घेऊन झोपतात. सकाळी उठले की थकवा जातो. सकाळी ताजेतवाने होतात. गडी, गवंडी, सुतार, मजूर, हमाल यांना शारीरिक कष्ट जास्त व बुद्धीचे काम कमी असते म्हणून हे लोक शरीराने धष्टपुष्ट असतात परंतु बुध्दीचे काम करणारे सापडत नाहीत. तेव्हा बुद्धीचा वापर करणा-याने शक्ती अधिक टिकवण्यासाठी ध्यान धारणा करणे. (खंड २)


।। श्री गुरुदेव दत्त ।।

Privacy Policy