आपली भाषा निवडा: घरपोच ग्रंथसेवा


प्रश्न: मनाचा क्षुद्रपणा कसा घालवावा?


उत्तर: प. पू. महाराजांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, आपल्या धर्म शास्त्रांमध्ये दान धर्माचा मोठा प्रभाव सांगितलेला आहे. मनाचा क्षुद्रपणा व असमंजसपणा कमी करण्याचे मोठे साधन आहे. चैनीने क्षुद्रपणा कमी होत नाही. फक्त दानधर्मच हे दोष घालविण्याचे साधन आहे. दानधर्म केल्यानंतर मोबदला मागू नये. जर मोबदला मागितला किंवा अपेक्षा ठेवली तर दानधर्म सत्कारणी लागत नाही. दानधर्माचा मोबदला मागितला नाही तर ही ईश्वराची सेवा होते. इतका उदात्त हेतू या दानधर्मामागे दडलेला आहे. ज्यांच्या कुळात दानधर्म होत नाही. अशा कुटुंबात अपंग, अर्धवट, आजारी मुले जन्माला येतात. काही घरांमध्ये लहान मुलं आजारी नसतील पण मोठी माणसे बाराही महिने आजारी रहातात. डॉक्टरांचा व औषधाचा खर्च वर्षभर रहातो. दानधर्म केल्याने हे दुखणे ताबडतोब कमी होत नाही. परंतु दुखणे दूरकरण्यासाठी भरपूर सहाय्य होते. हे चेंगट दुःखणे अगोदरच घराण्यात दानधर्म न केल्यामुळे आलेले असते. दानधर्म केल्याने दुःखणे अधिक वाढत नाही व पुढे येणा-या पिढीला दुःखणी होत नाहीत. चारही वर्णाला दानधर्म करावयास सांगितलेला आहे. केवळ वैशांनीच दानधर्म करावा असे नव्हे. ब्राह्मणाने देखील इतर ब्राह्मणांना जेवू घालावे लागते. जर त्याने तसे केले नाही तर हा दोष रहातो व पुढे घराण्यात उद्भवतो. काही श्रीमंत कुटुंबात एखादा मुलगा वेडसर, अर्धवट, अपंग असा सापडतो. याचे कारण त्याच्या घराण्यात मागे दानधर्म केलेला नसेल. शिवाय इतरांचा तळतळाट घेतलेला असेल म्हणून अशी संतती जन्माला आलेली असते. हे त्यांना कळत नसते. तेव्हां प्रत्येकाने आपापल्या ऐपतीप्रमाणे दानधर्म करणे आवश्यक आहे, हे लक्षात ठेवा. (खंड ८)


।। श्री गुरुदेव दत्त ।।

Privacy Policy