आपली भाषा निवडा: घरपोच ग्रंथसेवा


प्रश्न: आजकाल आत्महत्येचे प्रमाण वाढलेले का दिसते?


उत्तर: प. पू. महाराजांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, मनाची दुर्बलता, काम करण्यात निराशा व जीवनात वैफल्याची भावना ह्या गोष्टी हताश लोकांना आत्महत्या करण्यास प्रवृत्त करतात. जर तुम्हाला सत्पुरुषांचा सहवास मिळाला तर वैफल्याची भावना नाहिशी होते. संत पुरुष आधार देतात. तुमच्या मनात आत्मविश्वास निर्माण करतात. ज्यांना सत्पुरुषाचा सहवास नाही अशा श्रीमंत लोकांना वैफल्याची भावना निर्माण होणे शक्य आहे. कारण पैशाबरोबर इतर नाद व व्यसने लागतात. नंतर अधःपतन ठरलेलेच असते परंतु गरीब माणसांतही ही वैफल्याची भावना कशी? मी इतके प्रयत्न करतो, कुठेच यश मिळत नाही. गरीबी हटत नाही म्हणून वैफल्याची भावना निर्माण होते. कायम दरिद्री राहणे चांगले नाही. त्यासाठी काहीतरी भरीव प्रयत्न होणे जरुरीचे आहे. गरीबांची श्रीमंताबरोबर बरोबरी करणे हे मूर्खपणाचे लक्षण आहे. तुमचेकडे हे आहे आमचेकडे नाही, ही विचारसरणी मनाला बोचणी निर्माण करते. गरीबांनी देखील कुवतीप्रमाणे अपेक्षा करावी. पात्रतेपेक्षा जास्त अपेक्षा करणे व त्या पूर्ण झाल्या नाहीत तर जीवनात पोकळी निर्माण होते व नैराश्य भावना वाढीला लागते. सामान्य स्थितीचे आईबाप देखील मुलीसाठी स्थळ पाहताना फार मोठी अपेक्षा करतात. श्रीमंताचा मुलगा पाहिजे, इतके शिक्षण, इतका पगार, देखणेपणा वगैरे. परंतु बापाने स्वतः मात्र गरीब घराच्या सामान्य मुलीशीच लग्न केलेले असते हे ते विसरतात. पात्रतेपेक्षा मोठी अपेक्षा व हाव नको. त्याकधीच पूर्ण होऊ शकत नाहीत. (खंड २)


।। श्री गुरुदेव दत्त ।।

Privacy Policy