आपली भाषा निवडा: घरपोच ग्रंथसेवा


प्रश्न: पूजा करण्याअगोदर काय काय काळजी घ्यावी?


उत्तर: प. पू. महाराजांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, देवाची पूजा करण्याअगोदर संकल्प करण्याची पद्धत आहे. संकल्प करताना नक्षत्र, वार, तिथी, महिना, शके, साल वगैरे व्यवस्थित सांगावे लागते. त्यासोबत सूर्य, चंद्र आकाशात कोणत्या नक्षत्रात आहेत यांचा उल्लेख करावा लागतो. त्याशिवाय त्या त्यानिरनिराळ्या स्थानाचे दोष नाहिसे होणार नाहीत. काही घरांमध्ये यजमान स्वतः पूजा करीत नाहीत; परंतु पूजा करण्यासाठी ब्राह्मणांना, भिक्षुकांना सांगतात. भिक्षुकांना आमच्या एवढा व्यवस्थितपणा जमत नाही वा आवडत नाही. काही वेळा घाईगर्दीमध्ये त्यांच्याकडून पंचांग पाहायचे राहून जाते म्हणून पूजा करताना ते लोक अंदाजाने वरील स्थानाचा उल्लेख करतात. पुष्कळ वेळेला ही माहिती चुकीची असते. म्हणून यजमानाला पुजेचे पुण्य मिळत नाही म्हणून रोजची तिथी, वार, पंचांगाप्रमाणे माहिती असणेआवश्यक आहे. नगर मधील एक भक्त आमच्यासारखा व्यवस्थितपणा त्यांच्या घरी आणू इच्छितात असे सांगतात. म्हणून आमच्यासारखे कडक सोवळे भिक्षुकाला पाळायला सांगतात. जर भिक्षुक चुकले की, ताबडतोब अडवितात. भिक्षुक तणतण करतात, रागवारागवी होते म्हणून पुजेच्या वेळी थोडी काळजी आवश्यक आहे. (खंड ८)


।। श्री गुरुदेव दत्त ।।

Privacy Policy