आपली भाषा निवडा: घरपोच ग्रंथसेवा


प्रश्न: एका बाहेरगांवच्या भक्ताने विचारले की, मी बाहेर काही खात नाही. आश्रमात जेवण घेतले तर चालेल का?


उत्तर: प. पू. महाराजांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, तुम्हाला काही मंत्र मुखोद्गत असतीलही ह्याचा अर्थ असा नाही की, तुम्हाला संपूर्ण धर्म समजलेला आहे. घोकंपट्टीने ज्ञान वाढत नाही. पाढे पाठ करणारे विद्यार्थी हुषारच निघतात असे तुम्हाला कोणी सांगितले? गुरुकृपेशिवाय विद्वत्ता वाढत नाही. समय सूचकताही येत नाही. गुरु वाक्य प्रमाण माना. त्यावर संपूर्ण विश्वास ठेवा तरच तुमची प्रगती होईल. गुरुमुखांतून जो उपदेश होईल त्यावर संपूर्ण विश्वास ठेवा तरच तुमचे जीवनात स्थिरता निर्माण होईल. पुस्तकी विद्या व घोकंपट्टी उपयोगी पडणार नाही. ही अतिशय लहान व तोकडी विद्या आहे. तुमचे स्वतःचे ज्ञान व धर्माच्या कल्पना बाजूला ठेवा. आज सकाळी तुम्हाला श्री गुरु चरणांचे दर्शन घडविले आहे. मोकळ्या मनाने, पोटभर जेवून घ्या. तुमचा अतिसुशिक्षितपणा येथे नको. दोष अन्नमधून व पिण्याच्या पाण्यातून शरीरात जास्त जातात हे खरे आहे. परंतु काही ठिकाणे अशी आहेत की, तेथे अन्न घेतले नाही तर दोष लागतात. आपल्या आश्रमात आम्ही जेव्हां प्रसाद घ्यावयास सांगतो, तेव्हां तो घेतलाच पाहिजे. ह्या अन्नाला एक विशेष प्रकारची चव असते. कितीही प्रयत्न केला तरी अशी चव तुमचे घरच्या अन्नाला येणार नाही. येथील प्रसाद घेतल्याने तुमचे दोष कमी होतात. फक्त आश्रमासारखे ठिकाणचे अन्न खाल्याने दोष कसे कमी होतात ह्याचा खुलासा विज्ञानवादीही देऊ शकत नाही. (खंड २)


।। श्री गुरुदेव दत्त ।।

Privacy Policy