आपली भाषा निवडा: घरपोच ग्रंथसेवा


प्रश्न: ग्रहण काळात आपण कसे वागावे आणि का?


उत्तर: प. पू. महाराजांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, "ग्रहणकाळात आपण काही खाऊपिऊ नये व त्यावेळी देवांचे नामोच्चार करावे. स्मरण करावे. आपण देवधर्म करतो ते आपल्यासाठीच, देवासाठी नाही. काही भक्तांचा असा समज असतो, की आपण जे देवधर्म करतो, त्यामुळे देवांना शक्ती मिळते व त्या शक्तीद्वारे तो इतर भक्तांचे कल्याण करतो ही कल्पना चुकीची आहे."
देवांचे स्मरण केल्याने आरोग्य चांगले राहते. ग्रहण काळात अनेक अनिष्ट असे जीवजंतू निर्माण होतात. त्या कालात जर आपण खाणे पिणे केले तर ते आपल्या शरीरात जातात. त्यामुळे अनेक नवीन व दुर्धर रोगांचा प्रादुर्भाव होतो. हे विज्ञानाने देखील आता मान्य केले आहे.
ईश्वराचे नाव घेतल्याने, आपला श्वास नेहमीच्या श्वासाच्या गतीपेक्षा मंद चालतो, त्यामुळे शरीरावर चांगला परिणाम होतो. जितकी श्वासोच्छवासाची गती मंद, तितके मन शांत आणि जितके मन शांत तितके शरीर स्वास्थ चांगले समजावे. दुसरे म्हणजे आपल्या पूर्वजांनी सांगितले आहे की, ग्रहण संपल्यानंतर थंड पाण्याने स्नान करावे. थंड पाणीच का? ह्याचा ते खुलासा करु शकले नाही. परंतु त्याचे शास्त्रीय कारण असे आहे की, ग्रहण काळात निर्माण झालेले जीवजंतू आपल्या अंगावर चिकटतात व ते केवळ गार पाण्यानेच मरतात.
काही वेळेला ग्रहण आपल्या भागातून किंवा देशातून दिसत नाही परंतु ते जगाच्या इतर भागातून दिसते. त्यावेळेला आकाशात हे ग्रहण चालू असते व सुर्याचा प्रकाश पृथ्वीवर येण्यास अवरोध निर्माण होतो. आपण सर्व तेजाची पूजा करणारे आहोत. तेव्हा ग्रहण काळात प्रकृती मलुल बनते व सर्व ठिकाणी वातावरण उदास बनलेले आपण पहातो. आपण धार्मिक विचाराचे लोक आहोत व शास्त्राप्रमाणे आचरण ठेवणारे आहोत. ग्रहण स्पर्शापासून सुटेपर्यंत विशेष सांभाळणे हेच चांगले होय. (खंड २)


।। श्री गुरुदेव दत्त ।।

Privacy Policy