आपली भाषा निवडा: घरपोच ग्रंथसेवा


प्रश्न: देवांची कृपा लवकर व्हावी म्हणून काही उपाय योजना आहेत का?


उत्तर: प. पू. महाराजांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, सात्विक गुणाने देवांना भजले तर लवकर कृपा होते. रजोगुणाने भजले तर कृपा होण्याची शक्यता निर्माण होते. कृपा होईलच असे सांगता येत नाही आणि जर तमो गुणाने भजले तर कृपा होणारच नाही. तमोगुणांचा परिणाम वाईटच होतो. सत्वगुणाने भजले की, आपला उत्कर्ष नक्कीच होतो. आपली भक्ती कशी आहे? जर ओळखायचे असेल तर उपासनेने आपली प्रगती व उत्कर्ष होतो की नाही हे तपासावे. जर अवनती होत असेल तर आपली भक्ती रजोगुणांनी युक्त आहे असे समजावे. आपली उपासना कुठे चुकते आहे हे तपासा व योग्यमार्गाने उपासना करा. (खंड २)


।। श्री गुरुदेव दत्त ।।

Privacy Policy