प्रश्न: साधु पुरुष कोणास म्हणावे व का?
उत्तर: प. पू. महाराजांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, ज्या व्यक्तिंचे सर्व विषय
क्षय पावलेले आहेत, त्यामुळेच जीवन उज्वल झालेले आहे, जे तेजस्वी जीवन जगतात, त्यांनाच
साधु पुरुष म्हणावे. पुष्कळ सामान्य लोक आमचे दर्शनास येतात व चमत्काराची अपेक्षा करतात.
बाहेर इतर ठिकाणी त्यांना चमत्कार बघण्याची सवय लागलेली असते. तीच अपेक्षा येथेही करतात.
आम्ही त्याला फक्त रोज दर्शन करुन जा म्हणून सल्ला देतो. ते त्यांना पटत नाही. इतर
चार लोक नमस्कार करतात म्हणून मीही नमस्कार करतो. अशाने आशीर्वाद मिळत नाही. नमस्कार
करताना मनात भक्तीभाव पाहिजे. शिक्का कितीही नवीन असेल परंतु पॅड ओले नसेल तर कितीही
शिक्के मारले तर काहीच उमटणार नाही. पॅड जर भक्तीने ओले असेल तरच शिक्का चांगला उमटेल.
(खंड २)