|| श्री गणेशदत्तगुरुभ्यो नमः ||


आपली भाषा निवडा: घरपोच ग्रंथसेवा


प्रश्न: मला कडक उपासना करावयाची आहे तेव्हा मी मंगळवार शनिवार निर्जल उपवास करु का?


उत्तर: प. पू. महाराजांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, शरीराला पीडा देऊन कधीच ईश्वर कृपा होणार नाही. ईश्वर प्राप्ती ही कधीच सुदृढ करीत नाही. शरीर व्यवस्थित ठेवणे; शरीर सांभाळणे हे तुमचे काम आहे. शारीरिक पीडा सहन करावयास ईश्वर कधीच सांगत नाही. त्यासाठी ईश्वराला नावे ठेवणे नको. देवावर टीका नको. आंबे चांगले, गोड व मधुर यावे म्हणून आंब्याच्या झाडाला दूध घालावे लागते हे लक्षात घ्या. तुमचे म्हणण्याप्रमाणे कडक उपासना करणे हे योग्य नाही. हा वाजवीपेक्षा जास्त हट्ट आहे. तुम्ही कडक उपासना कशाकरीता करता? तर काही लोक संतती प्राप्तीसाठी, काही लोक चांगली नोकरी मिळावी म्हणून तर काही लोक सांपत्तिक स्थिती सुधारावी म्हणून वगैरे वगैरे. बाहेर इतर रिकामटेकडे गुरुसामान्य भक्तांना असे चुकीचे मार्गदर्शन करतात. असे चुकीचे मार्गदर्शन उपयोगाचे नाही. शनीची पीडा ही शनिवार करुन नाही तर शनी देवाला वंदन करुन टळेल हे पुष्कळ लोकांना माहीत नाही. तुम्ही उपवास करता की नाही मी कधीही चौकशी करीत नाही. तुम्ही चतुर्थीचा उपवास सोडता केव्हा? सकाळी की संध्याकाळी असल्या चौकशाही मी करीत नाही. आमचे मते व्रत वैकल्ये हे दुय्य्म आहे. उपास तापास करुन काहीही प्राप्त होणार नाही. जीवनात रोजच्या कार्यक्रमामध्ये काही नियम व निश्चयकरा त्याप्रमाणे वागा. दिवसातील काही वेळ ईश्वरचिंतन, मनन करा. असे केल्यानेच तुम्हाला तुमची इच्छा पूर्ण करता येईल. कडक व निर्जल उपवासाने कधीच इच्छा पूर्ण होणार नाही. विनाकारण मनस्ताप वाढेल. (खंड २)


।। श्री गुरुदेव दत्त ।।