आपली भाषा निवडा: घरपोच ग्रंथसेवा


प्रश्न: एका अतिसुशिक्षित व्यक्तीने विचारले की, मी इतके शिक्षण घेतले आहे, पूर्वापार चालत आलेल्या रुढीवर विश्वास नाही. मी वडीलांचे श्राद्ध करावे का?


उत्तर: प. पू. महाराजांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, काही लोकांचा पैशात कमालीचा जीव अडकलेला असतो. स्वतःजवळ पैसा भरपूर असतो, परंतु पैसा असून देववत नाही. दुस-याला मदत करीत नाही. दानधर्म करीत नाही. आजकाल शिक्षणाचा प्रसार पुष्कळ झालेला आहे. कैक सुशिक्षित घराणी श्राद्ध करीत नाहीत. अन्नदान करीत नाहीत. पूर्वीच्या रुढी, परंपरा मानीत नाहीत. अशी कित्येक घराणीच्या घराणी बरबाद होतात; झाली आहेत. त्याची कारणे शोधता येत नाहीत. अशाच एका घराण्यापैकी एका भक्ताने विचारले की, श्राद्धावर माझा विश्वास नाही. त्यासाठी जो पैसा खर्च करावयाचा आहे तो शिक्षणावर खर्च केला तर चालेल का? प. पू. महाराजांनी उत्तर दिले की, तुम्ही तुमच्या पूर्वजांपेक्षा शहाणे आहात काय? तुमचा शहाणपणा येथे बंद करा. चालत आलेल्या रुढी वेळच्या वेळी करा. मृत आत्मे केव्हा तुमच्या बोकांडी बसतील सांगता येणार नाही. जिवंत असताना मनुष्य कितीही बाहेरुन दयाळूपणा दाखवित असला तरी एकदा देह सोडला की त्यामध्ये दैत्यवृत्ती निर्माण होते व दुष्टवृत्तीमुळे त्रास देतो. सुबुद्धी रहात नाही. भलतेच निर्माण होण्याची शक्यता असते. जर मेल्यानंतर एखादा अवयव दान केला असेल (उदा. डोळा) तर त्या मृत व्यक्तीला गती मिळत नाही. शास्त्राप्रमाणे जे ज्ञान मला प्राप्त झाले आहे त्याप्रमाणे मी खुलासा करीत आहे. ज्या व्यक्तीला तो डोळा बसविला असेल ती व्यक्ती मेल्याशिवाय त्या मृत व्यक्तीला गती मिळत नाही. ती मृत व्यक्ती ह्या डोळा बसविलेल्या व्यक्तीला सुखाने जगू देत नाही. सारखा त्रास देईल असे वाटते. विज्ञानामध्ये शास्त्रीय प्रगती होत आहे, हरकत नाही. परंतु हे शास्त्र कोठे वापरावे हे समजावयास पाहिजे. अध्यात्माने ह्यावर सखोल अभ्यास केलेला आहे व मृत व्यक्तीस अग्निदाहच द्यावा असा धर्म शास्त्रात उल्लेख आहे. मनुष्य जिवंतपणी कितीही निस्पृही, निस्वार्थी दिसत असला तरी तो मरताना काहीतरी इच्छा मनात ठेऊनच मरतो. अग्नी संस्काराने त्या इच्छा नाश पावतात म्हणून अग्नी देऊन त्या मृत व्यक्तीचे संस्कार व इच्छा नाश कराव्या लागतात. जीवनभर कोणाचा बदला घ्यावयाचा, कोणावर उपकार करावयाचे, कधी त्रास झाला; कोण रागावले; कोणी मारले, ह्या प्रत्येक बाबींबद्दल मनात सुप्त रीतीने एक सल राहीलेला असतो. मरणा-या व्यक्तीला शेवटी वेळेच्या अभावी किंवा परिस्थितीनुसार ह्या इच्छा व्यक्त करता येत नाहीत; किंवा सांगता येत नाहीत. ह्या सर्व अतृप्त इच्छा स्थूल देहाबरोबरच नाहीशा कराव्या लागतात व ते काम फक्त अग्नी संस्कारानेच होऊ शकते. इतर कशानेही होऊ शकणार नाही. (खंड २)


।। श्री गुरुदेव दत्त ।।

Privacy Policy