प्रश्न: गोमांस निशिध्द का?
उत्तर: प. पू. महाराजांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, ज्याला अध्यात्मात प्रगती
करावयाची असेल त्याने मांसाहार करु नये. गोमांस भक्षणाने बुद्धी भ्रष्ट होते. वाईट
गोष्टी करण्याकडे कल निर्माण होतो. अमेरिकेमध्ये गोमांस भक्षण करतात. त्यामुळे तेथे
निसर्गक्रमा विरुद्धची अपेक्षा करतात व तसे संबंध ठेवतात. यामुळे काही अतिशय वाईट रोग
होतात. उदा. एडस वगैरे. याशिवाय वाईट व्यसने करण्याची सवय लागते. गोमांसाचे दुष्परिणाम
होतात. गोमांसाने कदाचित शरीर गुबगुबीत, चेहरा लालबुंद दिसत असेलही परंतु गोमांस भक्षण
अतिशय वाईट गोष्ट आहे. गाईच्या पोटात ३३ कोटी देव आहेत की नाही, हा प्रश्न नंतरचा,
परंतु गाईची हत्या करु नये व गोमांस खाऊ नये म्हणूनही असा प्रचार ऋषीमुनींनी केला असण्याची
शक्यता आहे की, ज्यामुळे आपल्याकडून गोमांस भक्षण होणार नाही, याची काळजी घेतली जाईल.
आपल्याकडे जे संत होऊन गेले त्यांचे आपल्यावर अनंत उपकार आहेत की त्यांनी आपल्याला
गोमांसापासून बाजूला ठेवले. (खंड ८)