आपली भाषा निवडा: घरपोच ग्रंथसेवा


प्रश्न: एका नास्तिक सुशिक्षिताने विचारले की, आम्ही जेव्हा धर्माचे काही करू लागलो की, काही लोक धर्माचे नावाखाली आम्हाला फसवितात असे का वाटते?


उत्तर: प. पू. महाराजांनी खुलासा केला की, भारत हा विशाल देश आहे. कोठे न कोठे बुवाबाजी चालत असेल. तेव्हा अडाणी लोकांचा गैरफायदाही घेतला जात असेल. फसविणे हा त्यांचा धंदाच आहे. परंतु तुम्ही तेथे जाऊन का फसता? तुम्ही स्वत: होऊन त्यांच्या जाळ्यात का अडकता? तुमचे शिक्षण किंवा पदव्यांचा काय उपयोग? तुमचे बुद्धी चातुर्य कोठे? केवळ ह्या घटनेमुळे नास्तिकपणाच्या गप्पा मारण्यात काही अर्थ नाही. शेवटी प्रत्येकाला एक न एक दिवस कोठे जायचे आहे हे लक्षात घ्या. मरणाचे स्मरण असावे.
सर्वसामान्य मनुष्य विषयामुळे बिघडतो आणि ह्या गोष्टीला जर पैशाची जोड मिळाली तर आणखीन बिथरतो. ईश्वरी संकेत कधीही कोणालाही खड्यात घालण्याचे किंवा नाश करण्याचे येत नाहीत. ईश्वरी संकेत नेहमी लोकांचे कल्याण करण्याचे असतात. (खंड ३.१४)


।। श्री गुरुदेव दत्त ।।

Privacy Policy