प्रश्न: प्रारब्ध व नियती यात काय फरक आहे?
उत्तर: प्रारब्ध तीन प्रकारचे असतात. अनिच्छा प्रारब्ध, स्वेच्छा प्रारब्ध व परेच्छा
प्रारब्ध. काही वेळा इच्छा नसताना पैसा खावा लागतो. त्याला अनिच्छा प्रारब्ध म्हणतात.
जो दुस-याच्या सांगण्यावरून पैसा खर्च करतो, त्याला परेच्छा प्रारब्ध म्हणतात. सर्वात
महत्वाचे म्हणजे स्वेच्छा प्रारब्ध. जे आपल्या अाधीन असते. आपण व्यवहार करीत असताना
काही चुकत नाही ना? हे पाहावे. काही काही वेळा चुका होत असतात. त्या लक्षात येतात.
त्या चुका लगेच सुधारून घ्याव्यात. झालेल्या चुका मान्य कराव्यात. परंतु चूक झालीच
नाही असा युक्तीवाद करत बसले तर चुका वाढत जातात. त्या चुकांचे प्रायश्चित होत असते.
परमेश्वर हा लगेच चुकांचे शासन करीत नाही. तो क्षमाशील आहे. जर चूक झाली हे मान्य केले
तर परमेश्वर क्षमा करतो. आपण रोजच्या रोज शुध्द करून घ्यावयास पाहिजे. जर आपण रोजच्या
रोज साफ राहिलो तर आपला दर्जा वाढतो. क्षमता वाढते. त्यासाठी नित्य उपासना व खरे बोलणे
हा मार्ग आहे. परंतु काही काही लोकांना चुका मान्य करण्याची सवय नसते. माझ्या हातून
चुकलेच नाही, हे शक्यच नाही आणि हे घडणेच शक्य नाही. असे सांगितले की गुंता वाढतो,
दोष वाढतो. अशावेळी दोष सरळ कबूल केला की प्रकरण मिटते. नियतीच्या नियमाप्रमाणे जन्म
मृत्यू ठरलेले असतात. नियती म्हणजे ईश्वराचे नियम. नियतीला कृपा करण्याचा अधिकार नाही.
नियतीमध्ये बदल करण्याचा अधिकार फक्त ईश्वरालाच आहे. स्वेच्छा प्रारब्धामध्ये मनुष्य
स्वप्रयत्नाने, कर्तृत्वाने उपासनेने बदल घडवून आणू शकतो. (खंड. ३.२०)