आपली भाषा निवडा: घरपोच ग्रंथसेवा


प्रश्न: माया म्हणजे काय? साधकांना दूर सारण्यासाठी भगवंताने ती निर्माण केली आहे काय?


उत्तर: भगवंत साधकाच्या मार्गात अडथळे निर्माण करण्यासाठी काहीही करत नाहीत. उलट तो आपल्या भक्तांना मदत करीत असतो. म्हणजेच भक्तांना भुलविण्यासाठी भगवंत मुद्दाम माया निर्माण करतो हे म्हणणे बरोबर नाही. माया म्हणजे भ्रम नव्हे. माया म्हणजे उत्पत्ती. भगवंताने निर्माण केली ती माया. माया म्हणजे भगवती. ती भगवंतानेच निर्माण केली होती. मायेचा लौकिक अर्थ ग्रंथामध्ये पाहण्याचे कारण नाही. काही ऋषी-मुनी अधिक साहित्यिक होते. वाल्मिकी रामायणामध्ये मानवी गुण अधिक प्रकर्षाने दर्शविले गेले आहेत. अधिक मनोरंजन करण्यासाठी असे करावे लागले आहे. प्रश्न असा निर्माण होतो जर राम हा श्रेष्ठ होता, तर त्याने सीतेसाठी शोक का केला? अवतारात दुस-याचा नाश विनाकारण करता येत नाही. तो घडवून आणावा लागतो. ज्याचा नाश करावयाचा त्याच्या वाटेला जावे लागते. प्रत्यक्ष सीतामाईने रामाला सांगितले होते की, रावण अतिशय बलाढ्य आहे. त्याचा नाश करणे शक्य नाही. मी माया निर्माण करते. परस्रीची इच्छा व अपहरण हे पातक आहे व ते पातक घडल्यावर रावण दुर्बल होईल. मग रावणाचा नाश करता येईल. भगवंत साधकाला साधक वृत्तीपासून दूर करीत नाही. तो जो दूर होतो तो आपल्या गुण व कर्मामुळे दूर होत असतो. मनाला बाह्य विषयाचे आकर्षण कमी झाले नाही, तर भक्त तपस्येला लायक नाही. आपल्या दोषांमुळे अडथळे निर्माण होतात. हे अडथळे अनुवांशिक सुद्धा असू शकतात. तुम्ही जरी कोणाला भुलला नाही तरी तुम्हाला कोणी भुलले तर तुम्ही काय करणार? यासाठी ईश्वराला नियमीत प्रार्थना करणे, नित्य उपासना करणे हाच मार्ग आहे. त्यामुळे साधक आपली प्रगती निर्विघ्नपणे करीत राहील. (खंड. ३.२१)


।। श्री गुरुदेव दत्त ।।

Privacy Policy