परमपूज्य सद्गुरुंनी पालकांना केलेले मार्गदर्शन
|| श्री गणेशदत्तगुरुभ्यो नमः ||
श्री रामकृष्ण उवाच - हल्ली येथे दर्शनाला येणारे बहुसंख्य भक्त त्यांची मुले ऐकत नाहीत,
अभ्यास करत नाहीत अशा प्रकारच्या तक्रारी करताना दिसून येतात. हे ऐकून मला दुःख तर
होतेच व आश्चर्यही वाटते, खरे पाहता तुमच्या मुलांवर “संस्कार” करण्याचे
काम तुमचे पालकांचेच असते. मग हे असे सर्वत्र का घडते? याचे मला एकच कारण दिसते की
तुम्ही तुमच्या मुलांचे फार लाड,खूप कौतुक करता. हे प्रमाणाबाहेर लाड-कौतुक झाल्यानेच
मुळे लाडवतात व हळू हळू तुमचे ऐकेनाशी होतात. त्यातून तुम्ही आई-वडील त्यांना शिस्त
लावण्यासाठी जेंव्हा रागावता, ओरडता तेव्हा तुमच्यातील एकजण त्या मुलाला ‘जास्त
ओरडू नका’ असे दुसऱ्याला त्या मुलादेखतच सांगत असतात. हे एकदम चूक आहे. खरे पाहता
मुलांना धाक-शिस्त लावण्यासाठी वडिलांनी वेळप्रसंगी थोडेफार मारायलाही हरकत नाही. मुलांना
शिस्त लावण्याचे काम वडिलांचेच असते. परंतु अशावेळी आईने मध्ये पडताच काम नये. ”माझ्या
कल्पनेप्रमाणे “माताच” मुलांचे अधिक लाड करतात त्यामुळे त्या मुलांना वडिलांच्या
रागापासून, मारापासून दूर ठेवीत असतात व स्वतःच स्वतःच्या मुलांचे नुकसान करीत असतात.
त्यामुळे मुलांना शिस्त-धाक-दरारा कसलाच राहिलेला दिसत नाही. त्यातून घरोघरी टी.व्ही.
आल्यानेही मुले-पालकांच्या बरोबर सर्व कार्यक्रम पाहू लागली आहेत. मुलांच्यावर चांगले
संस्कार होण्याच्या दृष्टीने पालकांनी सुद्धा टी.व्ही. पाहण्यावर नियंत्रण ठेवणे आवश्यक
असते. हे हल्ली कुठेही दिसून येत नाही. तसेच समाजात अतिसुशिक्षितपणा वाढल्यानेही घराघरातुन
मुलांना मारण्याचा प्रकारही विशेष कोठे दिसत नाही व दिसलाच तर मुलांच्या “माता”
त्या मारापासून मुलांची सुटका करताना दिसतात व शिवाय मुलांना बाहेर हॉटेल मध्ये खाण्यासाठी,
सिनेमा पाहण्यासाठी पैसेही देत असतात. घरात वडिलांचा, पुरुषांचा दरारा-धाक कोठेही दिसून
येत नाही. मुलांना धाक राहण्यासा्ठी तुम्ही नित्य त्यांना माराच, असे मी कधीही तुम्हाला
शिकवणार नाही परंतु मुलांना चांगली शिस्त लागण्यासाठी, त्यांना “मनापासून”-‘बसून’
अभ्यास करण्यासठी गरज पडेल तेंव्हा पालकांनी मारले ओरडलेच पाहिजे. काही घरातून “फ्री”
वातावरण सुरु झाल्याने ‘मुलांना’ आईवडील बरोबरीने वागवताना दिसतात. त्यांचे
लाड करताना दिसून येतात. हे चूकच आहे. वेळेवर जागे व्हा. मुलांना त्यांचे शिक्षण पूर्ण
करुन त्यांच्या पायावर उभे राहीपर्यंत त्यांना योग्य प्रकारे सांभाळणे, शिस्त लावणे,
मोठ्यांच्याबद्दल आदर निर्माण करणे इत्यादी आईवडिलांचीच जबाबदारी असते. त्यातून तुमची
सुटका हाणार नाही. जोपर्यंत मुलांचे वय अभ्यासाचे असते तोपर्यंत त्यांच्याकडून पालकांनी
अभ्यासच करुन घ्यावां. त्यांना पैसे मिळवण्यासाठी स्वतःच्या व्यवसायातही पालकांनी पाठवू
नये. पैसे मिळवण्याकडे एकदा मुलांचा कल झाला की ती मुले पुनः अभ्यास करण्यासाठी तयार
होत नाहीत. अभ्यास करताना मुलांचे फार लाड करू नका. मुलांना सकाळ-संध्याकाळ “क्लासला”
पाठवून पालकांची जबाबदारी संपत नाही. त्याचप्रमाणे ‘अभ्यास करुन तो दमलाय, त्याची
पाठ दुखते आहे, त्याला झोपून अभ्यास करू दे. नाहीतर त्याला झोपून ऐकू दे-मी त्याला
पुस्तकं वाचून दाखविते’ इ. प्रकार स्त्रिया मुलांच्या बाबतीत करताना दिसून येतात.
हे कधींही गैरच आहे. “मुलांना जरूर पडेल तेंव्हाच मारा” असे माझे सांगणे
सर्व पालकांना विशेषतः पुरुषांना आहे. मुले मोठी होऊन त्यांच्या पायावर उभी राहिली
की त्यांना हळूहळू स्वातंत्र्य द्यावे, त्यावेळी शिस्त लावणे चूकीचेच ठरेल.
|| श्री गुरुदेवदत्त ||
संदर्भ-अमृतकण क्र-१९८
दि.-२०/७/१९९६