आपली भाषा निवडा: घरपोच ग्रंथसेवा


।। प. पू. श्रीरामकृष्णस्तोत्र ।।
।।श्रीगणेशदत्तगुरुभ्योनमः ।।

श्याम वर्ण देहकांति, चंद्रनेत्री भानुतो ।
रुंद भाळ भस्मपंक्ति गंध बिंदूशोभतो ।
केशभार मस्तकास स्कंधि पृष्ठी डोलतो ।
रामकृष्ण सद्गुरुंसी दोन्ही हात जोडितो ।।१।।

उच्च - नीच भेदभाव मानसी न आणितो ।
भक्तप्रेमळास साह्य ज्ञानबोध सांगतो ।
ब्रह्मा, विष्णू, सांब तोचि, अत्रिपुत्र दत्त तो ।
रामकृष्ण सद्गुरुंसी दोन्ही हात जोडितो ।।२।।

अक्षमाळ कंठी हास्य, गोड भाष्य बोलतो ।
सर्व देव, सर्व तीर्थ पादपद्मि वास तो ।
आप्त इष्ट जाण सर्व, मायबाप बंधुतो ।
रामकृष्ण सद्गुरुंसी दोन्ही हात जोडितो ।।३।।

ब्रह्मचारी एकनिष्ठ श्रीगुरुसी लीन तो ।
ज्ञानमूर्ति त्याग शांती भक्त दीननाथ तो ।
कृष्णराधिका-सुताय राम क्षीरसिंधूतो ।
रामकृष्ण सद्गुरुंसी दोन्ही हात जोडितो ।।४।।

भक्त रक्षणार्थ कष्ट होती फार जाणतो ।
नाही तारणार्थ अन्य दूर काय ठेवितो ।
तार - मार संगतीत ठेवी दास प्रार्थितो ।
रामकृष्ण सद्गुरुंसी दोन्ही हात जोडितो ।।५।।

स्तोत्र पाठ नित्य नेम जो सुभक्त वाचतो ।
हेतु साध्य होती त्यास सत्य तेचि सांगतो ।
आर्त हाक ऐकण्यास देव सज्ज राहतो ।
रामकृष्ण सद्गुरुंसी दोन्ही हात जोडितो ।।६।।

नगरनिवासी राजाधिराज सद्गुरुराज श्रीरामकृष्ण महाराज की जय।


।। श्री गुरुदेव दत्त ।।

Privacy Policy