आपली भाषा निवडा: घरपोच ग्रंथसेवा


श्री प. I पू. I श्री वासुदेवानंद सरस्वती विरचितं

II श्री दत्त स्त्रोत्र II

हे स्त्रोत्र मूळ संस्कृत भाषेत आहे. विषय मुळांतच कठीण, त्यांत वासुदेवानंदांची पांडित्यपूर्ण प्रासादिक वाणी, त्यामुळे साधकांस कळण्यास महाकठीण झाले. म्हणून अगणित साधकांची दया येऊन सद्गुरूंनी ते सोपे करून सांगितले तसे लिहून घेतले. यात लेखनिकाची अक्कल शुन्य. हे संपूर्ण स्तोत्र श्री दत्त महाराजांची स्तुती करून, त्यांना भक्ताने केलेल्या विनवणीच्या स्वरुपांत आहे. किंबहुना या स्त्रोतांतील सहाव्या श्लोकांत स्वामी सुस्पष्ट शब्दांत सांगताहेत ''जो साधक प्रयत्नपूर्वक बुद्धी शाबूत ठेऊन ह्या पांच श्लोकांचं लक्ष देऊन वाचन करील त्यांचेमन स्थिरावून तो परमेश्वर कृपेला पात्र होईल." या श्लोकामुळे 'स्वामी आपण हे सांगितलं न्हवत' अस म्हणण्यास स्वामींनी वावच ठेवलेला नाही मुळी. सर्व साधकांचे शिरोमणी टेंबेस्वामी यांची शैली जरी अवघड वाटली तरी, दुर्दम्य ईच्छा असल्यास साधकाला त्यांचे मार्गदर्शन विभ्रमावस्थेत कदापि पडू देणार नाही. स्तुती करतांना वापरलेली दत्त महाराजांची विशेषणे हीच मन स्थिर करण्यासाठी उपयुक्त जिन्याच्या पायऱ्या आहेत, हे सद्गुरूंनी विशद करून सांगितले आहे. घोरात-कष्ट-उद्धारण-स्तोत्रांत सुद्धा स्वामींनी हीच पद्धती अवलंबिली आहे. भक्त दैवतापासून वेगळा न रहाण हेच खऱ्या भक्तीच लक्षण, म्हणून ज्या संबोधनांनी देवाला भक्त आळवतो त्यांच संबोधनांत वर्णिलेले दैवताचे गूण आत्मसात करणे, हि दैवतांशी एकरूप होण्याची जवळची वाट. किंबहुना हिंदूंची विभिन्न दैवते, म्हणजे विभिन्न साधना आहेत. त्या साधनांच्या योगे दैवी गूण आत्मसात करण्याचा सोपा मार्ग म्हणजे भक्तिपंथ. मूळ स्तोत्र संधी सोडवून आधी वाचूया.

अन-असूया-अ-त्रि संभूत दत्त अत्रेय महामते I
सर्व देवाधि देव, त्वंमम चित्तंस्थिरंकुरु II १ II

शरणागत-दीना-आर्त-तारका अ- खिलकारका I
सर्व चालक देव त्वंमम चित्तंस्थिरंकुरु II २ II

सर्व मंगल-मांगल्य-सर्व-आधि-व्याधि-भेषज I
सर्व संकट-हारिन: त्वंमम चित्तंस्थिरंकुरु II ३ II

स्मर्त्रुगामी स्वभक्तानांकामद: रिपु-नाशन: I
भुक्ति-मुक्ति-पद: स: त्वंमम चित्तंस्थिरंकुरु II ४ II

सर्व-पाप-क्षय-कर:, ताप-दैन्य-निवारण: I
य: अभीष्टद: प्रभु: स: त्वंमम चित्तंस्थिरंकुरु II ५ II

य: एतत-प्रयत: श्लोक-पंचकंप्रपठेत-सुधी: I
स्थिर-चित्त: स: भगवत-कृपा-पात्रंभविष्यति II ६ II

यावरील सद्गुरूंच स्पष्टीकरण आता वाचूया. II

शश्री प. पू. श्रीवासुदेवानंद सरस्वती विरचितंII

श्री गणेशाय नमः I सर्व साधकांच्या मना I
एकाग्र चित्त करण्या I प्रार्थितो तुझ II १ II

कधी ध्यानांत बैसतां I वोसण नाही चित्ता I
त्या सतत धावत्या I मना स्थिरकरी II २ II

सर्व योग्यांचा मेरु I सर्व गुरूंचा गुरु I
त्या श्री दत्तासी स्मरू I मन स्थिरावण्या II ३ II

सर्व विकारांचेमाहेर I ऐसी खालचींतीन चक्रं I
तींधुवूनि झाला निर्विकार I त्या अवधूता विनवूं II ४ II

अवतार त्या दत्ताचा I ऐसा योगिराज साचा I
ऐशा वासुदेवानंद सरस्वतींचा I उपदेश हा असे II ५ II

त्यांनीच हेलिहविले I नातरी आम्ही कारकून भले I
योगपुष्पांच्या स्मरणामुळे I मातीस आला सुगंध II ६ II

अन असूया वृत्ति I नाहींदुष्मनी कोणाशीं I
ऐशा मनोधारणेसी I माता केली II ७ II

अत्रि ज्याचा पिता I ना उद्भव भविष्यभूता I
केवळ वर्तमानी रमता I ऐसा सद्गुरुदत्त II ८ II

सर्व देवांचा ईश I विश्वंभरत्व ज्याचा अंश I
प्रेमेंजाहला विश्र्वेष I त्या गुरुदत्ता विनवणी II ९ II

त्यालाची जावेशरण I पूर्ण करुनी समर्पण I
मी देह या भावांतून I तीच निवारील II १० II

ऐसी आर्तता दाटावी I की सद्गुरुदत्ता दया यावी I
दयेपोटी त्यांनी दयावी I अद्वैताची अनुभूती II ११ II

जो काबूंत ठेवी चलन वळन I त्यापुढेका जाईल मन?I
ऐशा गुरुदत्ता समर्पून I जेहोई तेहोउंदयावें II १२ II

तो जेकरी तेंमंगल I सर्व व्याधी निवारील I
सर्व संकटेहरील I ऐशी श्रद्धा असो दयावी II १३ II

सतत स्मरण त्यांचे I पूर्णत्व देई साधनेतें I
मग षडरिपूंचें I भय मुळी न राहील II १४ II

भविष्य भूतांचेविचार I ना मनाला शिवणार I
हाच मुक्ती विचार I मनी सदा मिरवावा II १५ II

भोगणारा नाही दुजा I भोग्य कल्पनेच्या शेजा I
हेबाणवूनि मनोराज्या I काबूंत ठेवूंयेई II १६ II

अद्वैताचा अनुभव I या देहाला का मिळणार?I
मी देह हेंविसरणार I तेव्हाच मिळे II १७ II

पाप पुण्याचा हिशेब I हि देहभावाची बाब I
भिती आणि ताप I देहभावाची पिलावळ II १८ II

जेयोग्य साधकास I पचेल त्याला दिल्यास I
तेंच मिळो या भावास I मनामध्येस्थिरवावा II १९ II

ऐसी होता मन स्थिती I मन फिरेल जरी अवती भवती I
त्र्ययस्थपणेंत्यास पाहती I त्यांचेमन स्थिरावेल II २० II

ऐसी सतत साधना I संसारामध्येअसताना I
सर्व कार्येकरितांना I करी त्यावर कृपा होई II २१ II

केवळ पाठांतर करुनी I अर्थ न घेतला ध्यानी I
जेकथिलेवासुदेवानंदांनी I त्याचा उपयोग न होईल II २२ II

म्हणूनी सदगुरूंनी I सांगितलेविषद करुनी I
जेकथिलेवासुदेवानंदांनी I श्री दत्तस्त्रोत्रांत II २३ II

II इति चित्तस्थिर करणारेश्री दत्तात्रेय स्त्रोत्र संपन्न II

।। श्री गुरुदेव दत्त ।।

Privacy Policy