आपली भाषा निवडा: घरपोच ग्रंथसेवा


महिषासुराच्या उदात्तीकरणाचा वध

नमस्ते सिद्ध-सेनानि, आर्ये मन्दर-वासिनी,
कुमारी कालि कापालि, कपिले कृष्ण-पिंगले।।

महाभारताच्या युद्धाच्या प्रारंभी भगवान श्रीकृष्णांच्या आदेशावरुन अर्जुनाने दुर्गेची स्तुती केली होती. या स्तुतीला प्रसन्न होऊन आदिमाया दुर्गा प्रकट झाली आणि कुरुक्षेत्रात कालीच्या रुपाने दुष्टांचा संहार करु लागली. अर्थातच जेव्हा जेव्हा दुष्ट प्रवृत्तीचा नाश करणे क्रमप्राप्त झाले तेव्हा या आदिमायेने आपली माया प्रकट केली आहे. 
नवरात्र तर नाही आणि या दुर्गेचे अवेळी आवाहन करायचे प्रयोजन काय? तर त्याचं कारण सरळ आहे. महिषासुराची प्रजा पुन्हा एकदा जागृत होतेय! राजकारण हा भारताचा फार पुरातन विषय! याचे अनेक धडे भारतानेच या जगाला दिले. तसेच राजकारण हे सत्तेकरिता नसुन जनसामान्यांच्या कल्याणाकरिता केले जावे अशी शिकवण भारतीय राजनीतीने जगाला दिली. याचं मूर्तीमंत उदाहरण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज! महाराष्ट्राची कुलस्वामिनी, रक्षणकर्ती महामाया आई तुळजाभवानी हे सुद्धा दुर्गेचेच रुप! हिच्याच कृपेने एकेकाळी महाराजांनी अफजलखानासारखा रेडा मारला आणि दहशतवाद कसा संपवायचा याचं आदर्श उदाहरण घालून दिलं! ही दुर्गा म्हणजेच अवघ्या महाराष्ट्राचं कुलदैवत श्री खंडेराय यांची अर्धांगिनी! पण काही तथाकथित राजकारणी आणि समाजकंटक आमच्या श्रद्धास्थानांवर आघात करण्यासाठी महिषासुराचं उदात्तीकरण करु पहात आहेत! आणि या वर कळस म्हणून की काय? दुर्गेची अत्यंत अश्लिल शब्दात विटंबना करित आहेत! त्यासाठी यांनी थेट विद्यापीठं जी या भारतातली आद्य ज्ञानमंदिरं आहेत त्यांना आपल्या राजकारणाचे अड्डे बनवले आहेत!
कुणाला पटो अगर न पटो पण शिक्षण आणि राजकारण या दोन्ही गोष्टी एक होता कामा नये! शिक्षणाची मंदिरे असणारी विद्यापीठे ही राजकारणरुपी वेश्यावस्ती होता कामा नये! काही सत्तेची लालसा असणारी मंडळी सत्तेसाठी इतक्या खालच्या थराला जातील याची कधी कल्पना केली नव्हती! "अफजल हम शरमिंदा है तेरे कातील जिंदा है।"
भारत तेरे टुकडे होंगे ईन्शा अल्ला ईन्शा अल्ला! अफजल तेरे खुन से इन्कलाब आएगा । कितने अफजल मारोगे हर घर से अफजल निकलेगा । ही भारताची पैदास नक्कीच नाही! आता शोध हाच लागायचा बाकी आहे की अफजल गुरु ह्याच्या घरी गेला होता की ह्यांच्या आया अफजलच्या घरी! (कुपुत्रो जायेत् क्वचिदपि कुमाता न भवति । श्रीमद्आद्यशंकराचार्यांची माफी मागून) पण दुर्गा आणि भारतमाता ह्या आम्हाला मातेसमानच! त्यांचा अपमान हा कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतला जाणार नाही! आमची सहिष्णूता आम्हाला परस्त्रीचा सन्मानच करायला शिकवते! भारतात स्त्रीला दुर्गेचेच रुप मानतात तिची पूजा देखील करतात! पण मर्यादा सोडणारी शूर्पणखा! यज्ञादि विधीत अडथळा आणणारी त्राटिका तसेच पुतना यांना यमसदनी देखील पाठवले आहे! द्रौपदीच्या अब्रूवर टाकलेल्या हाताची किंमत १८ दिवसात ४० लाखांहून अधिक लोकांच्या आहूतींनी मोजावी लागलीय! हे प्रसंग विसरु नका! या भूमीत मर्यादा सांभाळणा-याची नेहमीच पूजा होते तर मर्यादा सोडणा-याचा सर्वनाश! 
आता थोडं महिषासुराविषयी बोलू! जे एन् यु मधे म्हणे महिषासुराचं प्रमोशन सुरु केलंय! कदाचित तो त्याचा वंश असेल! असो! युक्तीवाद किती बिनबुडाचा करावा? महिषासुर म्हणे एक न्यायी राजा होता! तो रेड्यावर बसायचा याचा अर्थ तो गवळी(यादव) होता! त्याला समकालिन उदाहरण दिलं ते ऐकून तर मती गुंग होऊन गेली़ म्हणे लालू प्रसाद यादवांना निवडणूक जिंकल्यावर म्हशीवर बसवून मिरवणूक काढतात! म्हणजे तो त्या काळात मागासवर्गीय होता असं यांना सुचवायचंय! आणि त्याचं राज्य बळकावण्यासाठी दुर्गेने त्याचा अन्यायाने वध केला!
आता थोडा महाभारताचा संदर्भ घेऊ़. भगवान श्रीकृष्ण हे देखील यादव कुळातले! कंस हा देखील यादव कुळातलाच! तसेच शिशुपाल हा देखील यादव कुळातला! श्रुतीश्रवा ही कृष्णाची आत्या आणि तिचा हा मुलगा! यांचा वध स्वतः भगवंतांनीच केला. कुंती ही देखील कृष्णाची आत्या! म्हणजे पांडव हे भगवान श्रीकृष्णाचे आतेभाऊ! भगवान श्रीकृष्णांचा जन्म हा चंद्रवंशातील तर श्रीरामांचा सूर्यवंशातील! 
चंद्रवंश हा भारतातील सर्वांत मोठा राजवंश आहे. सर्वांत यशस्वी राजवंश म्हणूनही याच्याकडेच अंगुलीनिर्देश करावा लागतो. ज्याच्या नावावरून या देशाला भारत हे नाव पडले तो राजा भरत याच वंशातील आहे. महाभारतातील युद्धाला कारणीभूत असलेले कौरव-पांडव याच राजवंशातील आहेत. इतकेच नव्हे, तर भारती युद्धात सहभागी झालेले बहुतांश राजेही याच वंशातील आहेत. ययाति-देवयानी, दुष्यंत-शकुंतला, पुरूरवा-उर्वशी अशा महानायक-नायिकांच्या जोड्या या चंद्रवंशाने भारताला दिल्या. कंस, जरासंध, दुर्योधन, शिशूपाल ही मोठी खलनायक मंडळीही याच वंशाने दिली. परशुरामाशी वैर घेणारे हैहय कुळातील राजे हे चंद्रवंशीच आहेत. नहुष हा चंद्रवंशातील पहिला ऐहिक पुरूष म्हणायला हवा. इंद्राची पत्नी शचि हिची इच्छा धरल्यामुळे नहुषाच्या नशिबी बदनामी आली. तथापि, तो अत्यंत पराक्रमी होता. त्याला ६ मुले होती. राजा ययाति हा त्याचा क्रमांक दोनचा मुलगा. वि. स. खांडेकरांनी आपल्या "ययाति" या कादंबरीत याचेच चरित्र वर्णिले आहे.
भगवान श्रीकृष्ण ही चंद्रवंशातील सर्वांत महान व्यक्तिरेखा होय. श्रीकृष्णाला यादव, वाष्र्णेय, माधव अशा उपाध्या महाभारत आणि इतर ग्रंथांत लावलेल्या दिसून येतात. या सर्व उपाध्या श्रीकृष्णाच्या वांशिक परंपरा स्पष्ट करतात. यदूवंशातील हैहय कुळात पुढे वीतिहोत्र राजा झाला. वीतिहोत्र याचा पुत्र मधु. मधुने मोठा पराक्रम गाजविला. त्याच्या नावावरून या वंशाला पुढे माधव हे नाव पडले. म्हणून श्रीकृष्णाला माधव म्हटले जाते. राजा मधुला १०० मुले होती. त्याच्या थोरल्या मुलाचे नाव होते वृष्णि. वृष्णिच्या नावावरून या वंशाला वाष्र्णेय असे संबोधले जाते. भगवान श्रीकृष्ण हा वृष्णिचा १४ वा वंशज ठरतो. 
एखाद्या राजाला जेव्हा अनेक कर्तत्ववान मुले असतात, तेव्हा तो वंश विभागला जातो. वंशावळ स्पष्ट व्हावी, यासाठी प्रत्येक मुलाच्या नावे वंशावळ दिली जाते. ज्या वंशात जास्त राजकीय घडामोडी घडतात, तो वंश जास्त चर्चेत राहतो. मान्यता पावतो. त्यादृष्टीने चंद्रवंशाच्या दोन मुख्य शाखा ठरतात. पहिली शाखा ययातिचा थोरला मुलगा यदू याच्यापासून तर दुसरी शाखा ययातिचा धाकटा मुलगा पुरू याच्यापासून सुरू होते. भारताचा संपूर्ण पुराणेतिहास या दोघांच्या वंशाचा इतिहास आहे, असे म्हटल्यास वावगे ठरू नये. यदू हा शुक्राचार्याची कन्या देवयानी हिचा पूत्र होता. पुरू हा असूर कन्या शरमिष्ठा हिचा पूत्र होता. पुरूच्या वंशात कौरव-पांडव जन्मले. यदूच्या वंशात भगवान श्रीकृष्ण जन्मले. चंद्रवंशात यदूची शाखा सर्वांत मोठी आहे. यदूच्या वंशजांना यादव म्हटले जाते. यदूचे वंशज म्हणून यादव. यादववंश हा भारताच्या अनेक भागांत पसरलेला आहे. संपूर्ण उत्तर भारत, बंगाल, ओरिसा आणि महाराष्ट्र एवढ्या मोठ्या भूभागावर आजही यादव वंश आढळतो. महाराष्ट्रातील देवगिरीचे राजघराणे यादव वंशी होते. शिवरायांच्या मातोश्री जिजाबाई यादववंशीच होत. सिंदखेडच्या जाधव घराण्यात जिजाऊंचा जन्म झाला. जाधवराव हे देवगिरीच्या यादवांचे वंशज समजले जातात. यादव राजे आपल्याला श्रीकृष्णाचे वंशज समजत. जिजाऊंचे पती शहाजीराजे मात्र सूर्यवंशातील आहेत. (यादव वंशाच्या अधिक माहिती साठी श्रीमद्भागवत ग्रंथाचे वाचन करावे)
आता यात कोण कोणाचे शत्रु आहेत? कोण कोणावर अन्याय करत आहेत? कोण मागासवर्गीय आहेत? कोण उच्चवर्णीय आहेत? आपलं काय चुकतं? तर आपण लोकांच ऐकून विश्वास ठेवतो! आता भगवान श्रीकृष्ण हे यादव वंशातील असून अर्जुनाला त्यांनी दुर्गेची आराधना करायला सांगितली! आता राहता राहीला प्रश्न सत्ता स्थापून मूळवासियांना हाकलून लावायचा तर हे पाप भगवंतांनी कदापि केलेलं नाही! रामावतारात रावणाचा वध केला "बिभीषणाला"(त्यांच्यातलाच चांगला राक्षस) राज्याभिषेक केला आणि लक्ष्मणाला सांगितले की-"लंका जरी सोन्याची असली तरी मला ती आवडत नाही कारण माता आणि मातृभूमी ही स्वर्गाहून देखील श्रेष्ठ असते!"(वाल्मिकी रामायण) तात्पर्य राज्य बळकावले नाही व न्यायाने राज्य करायला सांगून परत तिकडे कधीच फिरकले नाहीत! भगवान श्रीकृष्ण अवतारात देखील तेच! कंसाला मारलं राज्य घेतलं नाही, जरासंध, शिशुपाल इतकंच काय नरकासुराला देखील मारल्यावर त्याच्या मुलाला राज्यावर बसवलं! कुठे कुणाला हाकलंलय? नरसिंह अवतारात हिरण्यकश्यपूचा त्याच्याच इच्छेनुसार वध केला! भक्त प्रह्लादाला उत्कट भक्तीचं उदाहरण म्हणून जगन्मान्य केलं! याला सहिष्णूताच म्हणतात! उच्चनीच भाव जर भगवंतांच्या ठायी असता तर संत कान्होपात्रांना जवळ केलं नसतं! 
एका हिंदी गीताच्या काही ओळी मुद्दाम नमूद कराव्या वाटतात-
"एहसास थोडा तो जगाएं अपने दिलों में हम 
क्या नाम है अपना जहाँ में, खड़े हैं कहाँ पे हम
है हमें जाना कहाँ , चले हैं कहाँ पे हम
हमसे पूछे है यह मातरे वतन |" 
ह्या भूमीला अविवेकाचा आणि विश्वासघाताचा शाप आहे की काय असं वाटल्यावाचून रहात नाही! ही वाटचाल विनाशाकडेच चालू आहे. विनाशकाले विपरीत बुद्धी अशी अवस्था सर्वत्र दिसून येतेय! गेल्या ८ महिन्यापूर्वी हजारो वर्ष भारताला माहित देखील नसलेला शब्द इतका थैमान घालत असेल तर चूक आमच्या अविवेकी वागण्याची आहे. शेवटी कलीयुग आहे! जिथं चांगलं चाललंय तिथं वाईट करायचं वरदान कलीला आहे! तो लिंग आणि जिव्हा याचा ताबा घेतो! आणि एकदा तावडीत सापडला की मग त्याचा कोण होतो हे वेगळं सांगायला नको! 

।। भारतमाता की जय ।।

-"श्रीरामकृष्ण" चरणरज
http://manmandiraa.blogspot.in/?spref=fb


।। श्री गुरुदेव दत्त ।।

Privacy Policy