*।। श्री गणेशदत्तगुरुभ्यो नमः ।।*
*गुरु म्हणजे अक्षरे दोन । अमृताचा समुद्र जाण ।*
*तयामध्ये बुडताची क्षण । केवी होय परियेसा ।।*
*वर्णानाम् ब्राह्मणो गुरु:।* अशी आपली अनादिकालाची परंपरा आहे. (*ब्राह्मण
म्हणजे दुसरे तिसरे काहीही नसून ज्या ब्राह्मण व्यक्तींनी पूर्णपणे पवित्र- निष्कलंक
राहून धर्माचरण केले आहे त्यांनाच गुरु होण्याचा अधिकार असतो. ज्यांना तो अधिकार नाही
त्यांनी गुरु होण्याचा प्रयत्न करु नये तसेच तपस्याही करुच नये. त्यांनी फक्त गृहस्थाश्रम
स्वीकारावा व संसार करावा.* - परमपूज्य श्रीरामकृष्ण क्षीरसागर महाराज [अमृतकण क्रमांक-२१६,पृष्ठ
क्रमांक-१४,दि-१७/०१/१९९८])
*गुरु* ही कोणी व्यक्ती नसून ते *एक
तत्त्व* आहे. जे विश्वाच्या उत्पत्तीपासून निसर्गाची सर्वोत्तम निर्मिती
असणा-या मानवाला मार्गदर्शन करण्यासाठी या भूतलावर *अवतरत* आले आहे.
*अवतार* हा शब्द *अव (खाली)
+ तृ (उतरणे)*
अशा अर्थाने असून मूळ शक्ती निर्गुणातून सगुणात येणे होय. म्हणजेच *अव्यक्तातून
व्यक्त होणे
आणि व्यक्तातून
पुन्हा अव्यक्त
होणे* अशी अनादिकालाची परंपरा आहे. (*अव्यक्तादीनि
भूतानि, मध्य
व्यक्तानि भारत।* - श्रीमद्भगवद्गीता)
मंत्र दिला म्हणून गुरु, दीक्षा दिली म्हणून गुरु, माळ घातली म्हणून गुरु अशी सर्वसामान्य
प्राथमिक कल्पना गुरुंबद्दल असते. मात्र गुरु हे एक *व्यापक
तत्त्व* आहे. जे *स्मरणमात्रेण
सन्तुष्टाय।* असे आहे, ज्याच्या केवळ स्मरणानेच त्यांची
शक्ती आपल्या मागे कार्यरत होते. *दर्शने दोष
नासती* ज्यांच्या केवळ दर्शनाने सर्व दोष दूर होतात. याची
प्रचिती अगदी पहिल्या दर्शनापासून येते. *गुरुस्थानाशी
जातानाचे आपण
आणि गुरुस्थानातून
येतानाचे आपण
हा आपल्यातील
होत असलेला
बदल आपल्यालाच जाणवतो.*
*गुरुपरंपरा* ही *मूळ शिवापासून*
सुरु झालेली असून *ज्ञान, त्याग
आणि वैराग्य* हे या परंपरेचे
*मूळ वैशिष्ट्य* आहेत. या मार्गात
*गुरु हे
जन्मालाच यावे लागतात.*
म्हणूनच अशा गुरुंना *वयाच्या दहाव्या
वर्षापर्यंत ईश्वरी
साक्षात्कार* झालेला असतो. त्यामुळे *भौतिक
सुखांबद्दल ते
उदासीन* असतात. म्हणूनच ते *निःस्पृह
आणि त्यागी
वृत्तीचे* असतात. दयाळू वृत्तीमुळे सर्वच जीवांना *समान
दृष्टीने* ते पाहू शकतात. अर्थातच *जातीभेद,
वर्णभेद व
धर्मभेद अशा
गुरुंच्या ठिकाणी
दिसत नाही.*
(*समाजातील अवतारी पुरुष, सत्पुरुष तसेच संत ओळखण्याची सोपी पद्धत म्हणजे अधिकारी व्यक्तींना
कोणतेही व्यंग नसते व ते कधीही प्रसिद्धीच्या मागे नसतात* - परमपूज्य श्रीरामकृष्ण
क्षीरसागर महाराज {अमृतकण क्रमांक-२०३, पृष्ठ क्रमांक-६, दि-१५/१२/१९९६})
परंपरेतील गुरुंचे आणखी एक विशिष्ट्य म्हणजे ते आपल्या *शिष्यांना
मार्गी लावून
सोडून देत
नाहीत* तर त्यांच्याकडून कर्तव्य करुन घेतात.
*मनुष्याला प्रारब्धानुसार
प्राप्त झालेले
भोग हे
भोगूनच संपवावे
लागतात* हे त्रिकालाबाधित वास्तव ते भक्तांना स्वीकारण्यास सांगून
ते भोगून संपविण्यासाठी भक्तांच्या पात्रतेनुसार शक्ती देतात किंवा त्यांची तीव्रता
कमी करतात. या अशा प्रकारच्या शिकवणीमुळे *भक्त
चमत्काराच्या नादी
न लागता
स्वतःची अध्यात्मिक
पात्रता वाढविण्यावर
भर देतो.*
ख-या गुरुस्वरुपाच्या ठिकाणी *न बोलता
सर्वकाही कळते
आणि न
मागता आयुष्यात
योग्य गोष्टी
योग्य वेळी
प्राप्त होतात.*
सर्व भौतिक सुखे नजरेसमोर असूनसुद्धा ती भोगण्याची इच्छा राहिली नाही की आपण गुरुकृपेला
पात्र झालो असे समजावे.
शिष्यांचे चार प्रकार -
*अ) आर्त - सतत काहीतरी मागणारे*
*ब) अर्थार्थी - प्रपंच करुन परमार्थ करणारे*
*क) जिज्ञासू - हे काय आहे हे जाणून घेण्याचा सतत प्रयत्न करणारे*
*ड) ज्ञानी - सर्व पूर्ण जाणणारे*
आपण ज्या प्रकारात मोडतो त्याप्रमाणे आपल्या गुरुंकडून अपेक्षा़ असतात, ख-या गुरुंच्या
ठिकाणी शिष्य कसाही असला तरी त्याची *अपूर्णत्वाकडून
पूर्णत्वाकडे प्रगती
करवून घेतली
जाते.* म्हणून अशा गुरुंना *सद्गुरु*
म्हणण्याची परंपरा आहे.
*दैवे उणे
असेल नरु, त्याने
आश्रयावा श्रीगुरु
।*
*तोच उतरे
पैलपारु, पूज्य होय
सकळिकासि ।। - (श्रीगुरुचरित्र
अध्याय १८)*
।। श्री गुरुदेव दत्त ।।