आपली भाषा निवडा: घरपोच ग्रंथसेवा




*।।श्री गणेशदत्तगुरुभ्यो नमः ||*


मी श्री सद्गुरूंच्या दर्शनासाठी निघालो होतो. तेवढ्यात एकानं विचारलं, *अहो तुम्हाला गुरूंची काय प्रचिती आली हो?* प्रचिती म्हणजे तुम्हाला काय म्हणायचं आहे? *प्रचिती म्हणजे आपला अनुभव हो.* हा तर केवळ शब्दार्थ झाला. मी पुन्हा विचारलं, *अनुभव म्हणजे तरी काय हो?* तेव्हा तो म्हणाला, "*काही लाभ झाला की नाही?*" लाभ म्हणजे तुम्हाला काय म्हणायचे आहे? माझ्या प्रश्नाने तो गडबडला. *लाभ म्हणजे हे हो असं तो हातवारे करून सांगू लागला.*
*लाभ! म्हणजे बाग-बगीचा, बंगला-गाडी, नोकर-चाकर, अफाट धन, सत्ता-ऐश्वर्य वगैरे.....वगैरे...*
*यातलं काही त्यांच्या मनात असणार.* स्वाभाविकच आहे. आपण वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे असंच काही मागण्यासाठी मिळवण्यासाठी जातो ना?
*आमदार, खासदार, मंत्री, सरकारी अधिकारी, वेगवेगळ्या संस्थांचे उच्च पदाधिकारी हे जसे; तसेच बुवा महाराज, योगी, गुरु... असेच जनसामान्यांना वाटत असतात.*
*देवही त्यांना त्यातलाच वाटतो नवसाला पावेल तो खरा देव!* हीच भावना.

सद्गुरू काय देतात?
*खरे सद्गुरू तुमचं सगळं नश्वर घेऊन जातात आणि समग्र अविनाशी तुम्हाला देतात.*
जन्मभर आपण *ओझ्यांची गाठोडी वाहणारे सुशिक्षित श्रीमंत, सत्ताधारी वाहक असतो. विद्येच ओझं, संपत्तीच ओझं, प्रतिष्ठेचं ओझं, सगळी ओझी सांभाळण्यात आपली हयात निघून जात असते. गुरुगृही ही खांद्यावरची, डोक्यावरची एकेक ओझी गळून पडतात. आपण मोकळे होतो. विद्या प्रवाही बनते, संपत्ती शुद्ध होते. सत्ता नम्र होऊन सेवा करू लागते. ही ओझी न राहता, ती चैतन्यशील, प्रवाही शक्ती बनते. आपण आतून बदलतो. आपला आचार शुद्ध, मोकळा आणि सर्वांना सुख देणारा होतो.*

श्री समर्थ रामदास स्वामींकडे शिष्याने मोक्षाची मागणी केली. स्वामी म्हणाले, *मी तुला मोक्ष देतो: तू मला काय देशील?*
शिष्य म्हणाला, आपण मागाल ते देईन.

*तुझ्याजवळ तू जमा केलेलं सगळं नाशवंत मला दे, तुला मी अविनाशी मोक्ष देतो.

पैसा अडका यापासून ते हे मी केलं, हे माझं आहे, इथपर्यंत सार नाशवंत आहे. ते दिलं की मोक्ष आपोआपच चालत येतो.*

*सद्गुरूंना तो द्यावा लागतं नाही. सद्गुरूचरणांची ही प्रचिती* असते

*।। श्री रामकृष्ण गुरु माझे आई मजला ठाव द्यावा पायी ।।*



।। श्री गुरुदेव दत्त ।।

Privacy Policy