श्रीरामकृष्ण सरस्वती (क्षीरसागर महाराज) - जीवन आणि कार्य
*।।श्री गणेशदत्तगुरुभ्यो
नमः ।।*
*गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू:
गुरुर्देवो महेश्वर:।*
*गुरु:साक्षात्
परब्रह्म तस्मै
श्री गुरवे
नमः ।।*
हा सर्वज्ञात, सुपरीचित आणि बहूतेक मुखोद्गत असा श्लोक! पण *गुरुपरंपरा*
हा कदाचित नवपरिचित अथवा प्रथमच वाचनी आलेला शब्द असू शकेल. या *श्लोकाचा
आणि या
शब्दाचा अत्यंत
घनिष्ठ संबंध *आहे, याची
कल्पना फार कमी जणांना असेल. जे या परंपरेशी निगडीत आहेत. त्यांच्या दृष्टीने हा परिचयाचा
असू शकतो. परंतु *एकेकाळी समग्र
जीवन व्यापलेल्या
आणि केवळ
आयुष्य नव्हे
तर मनुष्य
जन्मात अत्यंत महत्वाचे
असलेले गुरुस्थान
आणि त्यांची
अव्याहत सुरु
असणारी गुरुपरंपरा *याचा
समाजास विसर पडलेला दिसतो. पण *परीसाचा
विसर पडला म्हणून
तो त्याच्या
संपर्कात येणा-याचे
सुवर्ण करीत
नाही असे
मुळीच नाही!**आधी
ज्ञान मग
विज्ञान *अशी वस्तुस्तिथी ही फार अनादि कालापासून अव्याहत आहे.
अर्थातच ही* अतिप्राचीन गुरुपरंपरा
ही ज्ञानोपासनेवर*आधारलेली
आहे. *ज्ञान, त्याग,
वैराग्य *हे या परंपरेचे*मूळ
वैशिष्ट्य! *
खरं पाहिलं तर*अज्ञान, असत्य
आणि अंधार
ह्या अस्तित्वहीन
गोष्टी !* कारण यांना स्वतःचं स्वतंत्र अस्तित्वंच
नाही! एखाद्या अंधःकारमय खोलीत दीप प्रज्वलित केला की अंधार आपोआप दूर होतो, सत्य कळल्यावर
असत्याचा आपोआप नाश होतो तद्वत ज्ञान झाले की अज्ञानाचा नाश आपोआप होतो. अंधार, अज्ञान
व असत़्य यांना दूर करण्याच्या वेगळ्या प्रक्रिया नाहीत! त्यामुळे*शिष्याचे
सर्वप्रकारे अज्ञान
दूर करुन
त्याला आत्मोन्नतीच्या
मार्गाला लावण्याचे
कार्य*ही*गुरुपरंपरा*करत
आली आहे.*मनुष्य ही
निसर्गाची सर्वोत्तम
निर्मिती!*त्याला*मन,
बुद्धी, वाचा
आणि विवेक*दिला
आहे. ज्यामुळे तो*इतर प्राण्यांपेक्षा
वेगळा*ठरतो. तरीही तो हळू हळू शिकणारा प्राणी आहे.
षड्रिपू (काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर) हे त्याच्या देहासोबतच येतात. त्यामुळे
तो अज्ञानाच्या अंधारात चाचपडत राहतो. *मायामय
अशा या जगात
सत्ता, संपत्ती,
खोटी प्रसिद्धी,
शारीरिक सुखासिनता
यांनाच तो
सर्वस्व*मानू लागतो. या सर्वातून मार्ग दाखविण्यासाठीच
व*हे शाश्वत
सुख नसून
मधूर सुखाच्या यातना
आहेत* याचा*अनुभव
देण्यासाठी परमेश्वर
स्वतः "गुरुस्वरुपात"
अवतार*घेतो.
"शिवं ज्ञानोपदेष्टारं विष्णूं धर्मोपदेशकं विधी वेदप्रवक्तारं। अशी त्रैमूर्तींची
परंपरा आहे. म्हणून गुरु हे ब्रह्मा विष्णू व महेश्वर स्वरुपी मानले जातात!पृथ्वीच्या
उत्पत्तीपासून सुरु झालेली*ही परंपरा
अखंड, अविरत
अद्यापही सुरु
आहे. व
ती अहमदनगर
येथील वेदांत नगरात
परमपूज्य श्रीरामकृष्ण
क्षीरसागर महाराजांच्या
स्वरुपात प्रतिपश्चंद्रलेखेव
वृद्धिंगत होत
आहे.*
*श्रीगुरुपरंपरा*
*श्री आदिनाथ*
श्री विष्णू
श्री वसिष्ठ
श्री शक्ती
श्री पराशर
श्री व्यास
श्री बादरायण
श्री शुक
श्री गौडपादाचार्य
श्री गोविंदाचार्य
श्री आदिशंकराचार्य
श्री ज्ञानबोधगिरी
श्री ईश्वरतीर्थ
श्री नृसिंहतीर्थ
श्री विद्यातीर्थ
श्री शिवतीर्थ
श्री भारतीतीर्थ
श्री विद्यारण्य
श्री मळियानंद
श्री देवतीर्थ सरस्वती
श्री यादवेंद्र सरस्वती
श्री कृष्ण सरस्वती
श्री नृसिंह सरस्वती
*श्री रामकृष्ण
सरस्वती (क्षीरसागर
महाराज)*
- संदर्भ-*श्रीगुरुपरंपरा स्तोत्र*
(*वेदधर्माचे कार्य करणे, वेदपरंपरा चालविणे, वेदांना महत्वं देणे अशी परंपरा ज्या
ठिकाणी आहे तीच खरी गुरुपरंपरा आहे* - परमपूज्य श्रीरामकृष्ण क्षीरसागर महाराज, अमृतकण
क्रमांक-२०३, पृष्ठ क्रमांक-०२, दि-१५/१२/१९९६)
*अखिल मानवांचे
कल्याण करणारी
ही परंपरा*आहे. ज्ञानाधिष्ठीत
परंपरा असल्याने*कुठेही चमत्काराला
स्थान नाही.
कुठेही ढोंग
नाही. प्रसिद्धी
नाही. भोगातून
त्यागाकडे नेणारी
ही परंपरा*असल्याने
या चरणांशी स्थिर झालेल्या*मनुष्याच्या
आचरणात तसेच विचारात
अमूलाग्र बदल*घडून
आलेला दिसून येतो.*या परंपरेचा
लाभ होणं
हे मनुष्यजन्माचं
सार्थक मानलं
जातं. मनुष्याच्या
जीवनातील योग्य "गुरुस्थान"
हे त्याच्या
अध्यात्मिक प्रगतीचं
लक्षण असतं.*
।। श्री गुरुदेव दत्त ।।